21 March 2023 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत Gold Price Today | बाब्बो! आजही सोन्याचे नवे दर ऐकून थक्क व्हाल, तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर कितीवर पोहोचला? Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा
x

Axis Mutual Fund | बँक FD नव्हे तर बँक म्युच्युअल फंडांचे दिवस आले, हे फंड पैसा पटीने वाढवत आहेत, लिस्ट सेव्ह करा

Axis Mutual Fund

Axis Mutual Fund | आजकाल म्युच्युअल फंड गुंतवणूक लोकांसाठी प्राथमिक आणि लोकप्रिय गुंतवणूक पर्याय बनला आहे. मोठ्या प्रमाणावर लोक आता म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला म्युच्युअल फंड कंपन्यांच्या सर्वोत्तम परतावा कमावून देणाऱ्या योजना कोणत्या आहेत हे माहित असणे आवश्यक आहे. चांगला परतावा कमावण्यासाठी चांगली म्युचुअल फंड स्कीम शोधणे आवश्यक आहे. परतावा आणि म्युच्युअल फंड कंपनीचे प्रदर्शन पाहून तज्ञांनी तुमच्यासाठी टॉप 5 म्युचुअल फंड सुचवले आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू शकता. अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना सेव्ह करा.

मागील 5 वर्षांचा परतावा :
म्युच्युअल फंडात 5 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. गुंतवणुकीचा काळ जसजसा वाढत जातो, तसतसा तुम्हाला गुंतवणुकीवर मिळणारा परतावा आणि नफाही वाढत जातो. अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजनांची माहिती जाणून घेऊ.

अॅक्सिस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना :
मागील 5 वर्षांपासून ही म्युचुअल फंड स्कीम आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 19.64 टक्के परतावा मिळवून देत आहे. या म्युचअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.45 लाख रुपयांचा बंपर परतावा कमावून दिला आहे.

अॅक्सिस मिडकॅप म्युच्युअल फंड योजना :
मागील 5 वर्षांपासून म्युचुअल फंड स्कीम आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक सरासरी 16.97 टक्के परतावा कमावून देत आहे. या म्युचुअल फंड योजनेने गेल्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.19 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

अॅक्सिस फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या योजनेत गुंतवणुक केलेल्या लोकांना मागील 5 वर्षांत वार्षिक सरासरी 14.41 टक्के परतावा मिळाला आहे. म्युचुअल फंड योजनेने गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.96 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

अॅक्सिस ब्लूचिप म्युच्युअल फंड योजना :
मागील 5 वर्षांपासून या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 14.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.93 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

अॅक्सिस फोकस 25 म्युच्युअल फंड योजना :
मागील 5 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 11.17 टक्के दराने परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत गुंतवणूक करून मागील 5 वर्षात लोकांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीमध्ये 1.70 लाख रुपयांची भर पडली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Axis Mutual Fund Scheme fir various types of market segment to increase returns margin from investment on 30 November 2022.

हॅशटॅग्स

Axis Mutual fund(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x