13 May 2024 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस?
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीला नवीन ऑर्डर मिळाली, वेळीच शेअरमध्ये गुंतवणूक करून फायदा घ्यावा का?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लक्षणीय तेजीत ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 2 टक्के वाढीसह 274.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला 200 मेगावॅट क्षमतेची फर्म आणि डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रकल्प विकसित करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या उपकंपनीला हे कंत्राट एसजेव्हीएन कंपनीने दिले आहे. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 2.38 टक्के घसरणीसह 266.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या Tata Power Renewable Energy Limited कंपनीला SJVN कंपनीने 200 MW क्षमतेची फर्म आणि डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रकल्प विकसित करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. सौर ऊर्जा, पवान ऊर्जा आणि योग्य क्षमतेच्या बॅटरी स्टोरेजच्या मिश्र संयोजनाने प्लांट उभारणीचे काम टाटा कंपनीला देण्यात आले आहे. FDRE संस्था 24 तास वीज पुरवठा सेवा प्रदान करण्याचे काम करते. आणि RPO व एनर्जी स्टोरेज ऑब्लिगेशन पूर्ण करण्यासाठी डिस्कॉमला सहाय्य करते.

पुढील तीन वर्षांत टाटा पॉवर कंपनी ऊर्जा क्षेत्रात 60,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतील निम्मा वाटा अक्षय ऊर्जा क्षेत्रात खर्च केला जाणार आहे. टाटा पॉवर कंपनी या काळात कोळसा आधारित कोणताही नवीन प्रकल्प सुरू करणार नाही. टाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 15,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने 20,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये टाटा पॉवर कंपनीने 22,000 कोटी रुपये आणि 2026-27 मध्ये 23,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. पुढील तीन आर्थिक वर्षामध्ये टाटा पॉवर कंपनीचा एकूण भांडवली खर्च 60,000 कोटी रुपयेवर जाण्याची शक्यता आहे.

टाटा पॉवर कंपनी 13,000 कोटी रुपये गुंतवणुक करून 2,800 मेगावॅट क्षमतेचे दोन हायड्रो इलेक्ट्रिक पंप स्टोरेज प्रकल्प स्थापन करणार आहे. तर कंपनीने 9,000 मेगावॅट क्षमतेचे आणखी तीन प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात पोटलपाली कातळधारा आणि नेनावली या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे.

यासोबतच भिवपुरी आणि शिरवटा या ठिकाणी दोन पीएसपीमधून निर्माण केल्या जाणाऱ्या विजेचे खरेदी करार करण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांना टाटा पॉवर कंपनीने सौर आणि पवन ऊर्जा क्षमतेशी जोडण्याचे संकेत दिले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE 30 November 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x