
Stock To Buy | शेअर बाजार सध्या विक्रमी पातळीवर ट्रेड करत आहे. निफ्टीने आपली पूर्वीची विक्रमी उच्चांक पातळी मोडून 18604 ची नवीन विक्रमी पातळी प्रस्थापित केली आहे. या वर्षी जगातील सर्व बाजारपेठामधे जी पडझड झाली होती, आता घसरण नाहीशी झाली असून स्टॉक मार्केट हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. मात्र बाजारात आर्थिक मंदीच्या भीतीमुळे अजूनही थोडी अनिश्चितता पाहायला मिळत आहे. महागाई आणि जगातील काही देशात सुरू असलेले भू-राजकीय तणाव याव्यतिरिक्त शेअर बाजार संभाव्य आर्थिक मंदीकडेही लक्ष ठेवून आहे. काही मोठ्या विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक मंदी अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांनी अशा वेळी सावध राहून दर्जेदार कंपनीच्या शेअर्समध्येच पैसे लावावे, असा गुंतवणूकीचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. तथापि काही कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय ब्रेकआउट आले असून हे स्टॉक पुढील 1 महिन्यात चांगली जबरदस्त परतावा मिळवून देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने तुमच्यासाठी 4 शेअर्सची निवड केली आहे, खालीलप्रमाणे
BHEL:
* सध्याची किंमत : 82 रुपये
* खरेदी किंमत : 80-76 रुपये
* स्टॉप लॉस: 72 रुपये
* अपेक्षीत वाढ : 15 टक्के – 27 टक्के
BHEL कंपनीच्या स्टॉकमध्ये साप्ताहिक चार्ट पॅटर्न नुसार 80-78 रुपये पातळींवरून एकाधिक प्रतिरोधक क्षेत्राचे ब्रेकआउट दिसून येत आहे. हे ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमसह झाले असून जबरदस्त वाढीचे संकेत देत आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचा कल सुरू झाला आहे, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. दैनिक आणि साप्ताहिक चार्ट पॅटर्न मध्ये देखील स्टॉक तेजीचे संकेत देत आहे. शेअर पुढील काळात 90-99 रुपयांची पातळी स्पर्श करू शकतो.
रेडिंग्टन लिमिटेड :
* सध्याची किंमत : 177 रुपये
* खरेदी किंमत : 177-173 रुपये
* स्टॉप लॉस : 163 रुपये
* अपेक्षीत वाढ : 14 टक्के -20 टक्के
रेडिंग्टन कंपनीच्या स्टॉकमध्ये साप्ताहिक चार्ट पॅटर्न वर 172-164 रुपये किंमत पातळीपासून एकाधिक प्रतिरोधक क्षेत्राचा ब्रेकआउट दिसून आला आहे. शेअरमध्ये ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमसह झाले असून स्टॉक मध्ये जबरदस्त वाढ होण्याचे संकेत मिळत आहे. शेअरमध्ये तेजीचा कल कायम दिसून येत आहे. हा स्टॉक त्याच्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग सरासरीच्या किमतीवर ट्रेड करत असून हे वाढीचे एक सकारात्मक दर्शक आहे. दैनिक आणि साप्ताहिक सामर्थ्य निर्देशक RSI मध्ये देखील तेजी कायम पाहायला मिळत आहे. या कंपनीचा शेअर लवकरच 199-210 रुपये किंमत गाठू शकतो.
अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ :
* सध्याची किंमत : 4789 रुपये
* खरेदी किंमत : 4750-4656 रुपये
* स्टॉप लॉस : 4445 रुपये
* अपेक्षीत वाढ : 11 टक्के-14 टक्के
अपोलो हॉस्पिटल्स कंपनीच्या शेअरमध्ये साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर खाली येणाऱ्या ट्रेंडलाइनचा ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये हा ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमसह पहायला मिळत आहे, जे शेअरमध्ये चांगल्या वाढीचे संकेत देत आहे. शेअरमध्ये तेजीचा कल कायम असून स्टॉक आपल्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग सरासरीच्या किमतीवर ट्रेड करत आहे. दैनिक आणि साप्ताहिक सामर्थ्य निर्देशक RSI मध्ये देखील तेजीचे संकेत मिळत आहे. हा स्टॉक पुढील काळी काळात 5220-5350 रुपये किंमत पातळी स्पर्श करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आरबीएल बँक :
* सध्याची किंमत : 150 रुपये
* खरेदी किंमत : 150-147 रुपये
* स्टॉप लॉस : 138 रुपये
* अपेक्षीत वाढ : 14 टक्के-19 टक्के
RBL बँकेच्या शेअरमध्ये दैनंदिन चार्ट पॅटर्नवर 148-143 किंमतीवर मल्टिपल रेझिस्टन्स झोनचा ब्रेकआउट दिसून येत आहे. स्टॉकमध्ये हा ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूम क्षमतेसह दिसून आला आहे. शेअरमध्ये तेजीचा कल कायम असून दैनिक आणि साप्ताहिक सामर्थ्य निर्देशक RSI मध्ये देखील तेजीचे संकेत मिळत आहे. हा शेअर पुढील काही दिवसात 169-176 रुपये किमतीवर पोहोचू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.