9 May 2021 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
थोडी जरी लाज शिल्लक असेल तर देशाची जाहीर माफी मागा | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पी. चिदंबरम इतिहास घुसमटला | दिल्ली इंडिया गेटच्या श्वास आणि देशवासीयांचा श्वास एकाच वेळी घूसमटत आहे कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा केंद्र सरकारचा ढिम्म कारभार | अखेर सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
x

मला कोणाला फसवायचं नाही | मला फक्त थोडा वेळ द्या - मंदार देवस्थळी

Marathi Producer Mandar Devasthali, Sharmishtha Raut, Instagram Post, Not Paying

मुंबई, २२ फेब्रुवारी: मला कोणाला फसवायचं नाही, मला फक्त थोडा वेळ द्या’, असं म्हणत प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी पैसे थकवल्याच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. याबाबत मंदार देवस्थळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मराठी मालिका विश्वात दबदबा असलेले प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मीसुद्धा बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे, असं स्पष्टीकरण देवस्थळी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे.

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे मानधन थकवल्याचा आरोप शर्मिष्ठा राऊतने इन्स्टाग्राम पोस्टमधून केला आहे. त्यानंतर देवस्थळींनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे.

हे सत्य आहे की मी सगळ्यांचे पैसे देणं लागतो. पण शोमध्ये मला भयानक नुकसान सहन करावं लागलं आहे. मी स्वत: आता प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे. मला कोणालाही फसवायचं नाही, कोणाचे पैसे बुडवायचे नाहीत. मी सगळ्यांचे पैसे देईन. मला माहित आहे, माझ्याकडून खूप उशीर झालाय. पण मी सगळ्याचे पैसे नक्की देईन. परंतु, मला थोडा वेळ हवा आहे. अजून काम करुन मी सगळ्यांचे पैसे परत करेन हे नक्की”, असं ते म्हणाले.

 

News English Summary: I don’t want to cheat anyone, just give me some time ‘, says renowned producer, director Mandar Devasthali on the allegations of money laundering. The actors of the small screen series ‘Hey Man Baware’ have accused Mandar Devasthali of extorting money through social media. Mandar Devasthali informed about this while talking to the media.

News English Title: Marathi Producer Mandar Devasthali Clarification On Sharmishtha Raut Instagram Post About Not Paying news updates.

हॅशटॅग्स

#Marathi TV Serial(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x