28 April 2024 1:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल
x

आज शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंसोबत महत्वाची बैठक

Shivsena, Aaditya Thackeray, Uddhav Thackeray, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आज आमदारांची बैठक होणार आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेवून उद्धव ठाकरे हे त्यांन मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच भाजपसोबत सत्ता स्थापनेबाबत त्यांची मतंही जाणून घेणार असल्याची चर्चा आहे.

सदर बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांची मतदेखील जाणून घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. आज दुपारी १२ वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडणार असून या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा कल जाणून घेणार आहेत. तसंच यानंतर शिवसेनेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

अबकी बार २२० पार’ हा निर्धार पूर्ण करू न शकल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे. सत्तास्थापनेसाठी मदत करताना शिवसेनेकडून भाजपवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. २०१४ मध्ये भाजपने दुय्यम वागणूक दिल्याची खंत अजूनही शिवसेनेच्या मनात आहे. ती कसर भरून काढण्यासाठी शिवसेनेने आता लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या ५०-५० च्या फॉर्म्युल्याची आठवण भाजपला करून दिली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर भाष्य करणे अनेकदा टाळले होते. मात्र, निवडणुकीचे निकाल जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याची भाजपला आठवण करून दिली. त्याच प्रमाणे यावेळी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता.

गरज भासल्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देखील त्यासाठी मुंबईत येऊ शकतात. मात्र, सत्तावाटपाचा तोडगा दिवाळीनंतरच निघेल. त्यामुळे फडणवीस सरकारचा शपथविधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे सूत्रांनी सांगितले. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान भाजप आमदारांची नेतानिवडीसाठी बैठक होईल आणि त्यात फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x