20 April 2024 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

फडणवीस यांचं दिल्लीतील भाजप वरिष्ठांकडून खच्चीकरण सुरु | ब्राम्हण महासंघाचा भाजपवर धक्कादायक आरोप

Brahman Mahasangh

Devendra Fadnavis | महाराष्ट्राचे राजकारण सतत नवनवे राजकीय वळण घेत आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्याची घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला, मग देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये भाग घेतला नाही. पण फडणवीस सरकारमध्ये सहभागी न होण्याबाबतची चर्चा शांत झाली का, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतून आदेश जारी केले.

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असे अप्रत्यक्ष आदेशच दिले :
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुरुवातीलाच फडणवीस यांनी मोठे मन दाखवल्याचे सांगितले. मात्र त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी माझी इच्छा आहे असे नड्डा म्हणाले. पण काही वेळातच जेपी नड्डा यांनी आणखी एक ट्विट केले आणि म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले आहे. अशा स्थितीत दिल्लीतून आदेश येताच देवेंद्र फडणवीस यांनाही हायकमांडचा मान राखावा लागला.

भाजपामध्ये अंतर्गत राजकरण :
दरम्यान, याच विषयावरून आता भाजपामध्ये अंतर्गत राजकरण सुरु झाल्याचं म्हटलं जातंय. नाट्यमय घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ शपथ घेतली. यावर आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण होतंय, असा आरोप करण्यात आला आहे. अखिर भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट केली आहे.

ब्राह्मण महासंघाची फेसबुक पोस्ट :
ब्राह्मण महासंघाच्या फेसबुक पोस्टवर गोविंद कुलकर्णी यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी या फेसबुक पोस्टवर कमेंटही केल्या असून या पोस्टवरुन सोशल मीडियात चर्चांना उधाण आलंय. ‘पंतप्रधान स्पर्धेमधून हटविण्यासाठी नितीन गडकरीच्या चारीत्र हननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्यानंतर गेले तीन वर्षापासून भाजपातील तथाकथीत नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडादौड अडविण्याकरीता पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा षड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले’ अशा शब्दात टीका करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Brahman Mahasangh made serious allegations on Delhi BJP over Devendra Fadnavis check details 01 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x