21 May 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

आ. भास्कर जाधवांची सुरक्षा कमी होते, मग रात्री घरावर पेट्रोलच्या बॉटल्स, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय

MLA Bhaskar Jadhav

MLA Bhaskar Jadhav | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. अशातच आता भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे. जाधव यांच्या घराच्या बाहेर पेट्रोलच्या बॉटल आणि स्टम्प सुद्धा आढळून आल्या आहेत.

भास्कर जाधव यांच्या घराच्या अंगणात दगड, क्रिकेटचे स्टम्प, पेट्रोल भरलेल्या बॉटल्स सापडल्या आहेत. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर चिपळूणमध्ये याची जोरदार चर्चा सुरू झालीये.भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी केला आणि कशासाठी केला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अज्ञातांकडून आमदाराच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडालीये.

मागील काही दिवस केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांची मुलं पत्रकार परिषद घेऊन अत्यंत खालच्या पातळीवरील टीका करताना महाराष्ट्र पाहतो आहे. कोकणातील केवळ एका मतदारसंघापुरता राजकीय अस्तित्व उरलेल्या राणे कुटुंबियांमुळे कोकणात सुद्धा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता स्थानिक पत्रकारांनी वर्तवली आहे. त्यात आजच्या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचे पुत्र आमदार नितेश राणे याचं खुलं समर्थन करतात यावरून देखील समाज माध्यमांवर तीव्र टीका होतं आहे.

राणे कुटुंबियांना सध्या त्याच्याकडे उरलेला कणकवलीचा एकमेव विधानसभा मतदारसंघ टिकवायचा आहे आणि त्यासाठी ते धडपडत आहेत. मात्र राणे कुटुंबायांच्या टीकेतील भाषेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाला नुकसान होऊ शकतं. राणे पिता पुत्रांचा राजकीय उन्मत्तपण राज्यातील जनतेच्या पचनी पडत नसल्याचं पाहायला मिळतंय. अगदी मुंबईतील कोकणी माणसाला देखील यावर विचारल्यास ते देखील राणे पिता पुत्रांबद्दल चांगलं बोलत नाहीत. त्यात शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची एकेरी आणि इतरांना तुच्छ समजण्याची भाषा लोकांचा पचनी पडत नाही. राणेंना केवळ ठाकरे कुटुंबावर राजकीय गरळ ओकण्यासाठीच मंत्रिपद दिलंय अशी चर्चा कोकणातील नाक्यांवर सुरु झाल्या आहेत. परिणामी याच फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Attack on MLA Bhaskar Jadhav house in Chiplun check details 19 October 2022.

हॅशटॅग्स

#MLA Bhaskar Jadhav(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x