27 July 2024 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

संसदेत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत घरी जाणार नाही | आंदोलक शेतकऱ्यांना मोदींबाबत शंका

Laws are repealed in Parliament

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर | केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची अखेर केंद्र सरकारने दखल घेतली आहे. तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी (laws are repealed in Parliament) आज केली.

Laws are repealed in Parliament. Farmer leader Rakesh Tikait has said that he will not back down till the laws are repealed in Parliament :

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी देशाला संबोधित केलं. गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर तिन्ही कायद्यांचं महत्त्व पटवून देण्यात सरकार म्हणून कमी पडलो असल्याचं सांगत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पाच दशकांच्या सार्वजनिक आयुष्यात मी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांची आव्हान जवळून बघितली आहेत. त्यामुळे जेव्हा देशाने मला पंतप्रधानपदाची संधी दिली. तेव्हा शेतकऱ्यांच्या कल्याणाला आम्ही प्राधान्यक्रम दिला. देशात १०० पैकी ८० शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. त्यांची संख्या १० कोटींहून अधिक आहे. ही माहिती बऱ्याचजणांना माहिती नाही.

याच जमिनीच्या तुकड्यावर ते स्वतःचा आणि कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवतात. पिढ्यानपिढ्या कुटुंबियांत होणारी जमिनीची विभागणी जमिनीचे आणखी तुकडे करत आहेत. त्यामुळे सरकारने बियाणांपासून सर्वच बाबींवर काम केलं आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडलं आहे”, असं मोदी म्हणाले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडल्याची कबुलीही दिली. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या हितासाठी संपूर्ण सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेने चांगली नियत ठेवून आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. एक वर्ग विरोध करत होता. ते आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. अनेकांनी त्यांना या कायद्याचं महत्त्वं सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आणि तर्कही जाणून घेतली. त्यात कसूर ठेवली नाही, असं ते म्हणाले.

कायदे संसदेत रद्द करा:
हे कायदे मागे घेण्याची घोषणा करतानाच शेतकऱ्यांना त्यांनी घरी जाण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, मोदींच्या या आवाहनानंतरही शेतकरी घरी जायला तयार नाहीत. जोपर्यंत संसदेत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत माघार नाहीच, असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

राकेश टिकैत यांनी एक ट्विट करून ही घोषणा केली आहे. आंदोलन तात्काळ मागे घेतलं जाणार नाही. ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील, त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत, असं टिकैत यांनी म्हटलं आहे. सरकारने एमएसपीसह शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करावी, अशी मागणीही टिकैत यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Laws are repealed in Parliament farmer leader Rakesh Tikait said he will not back down.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x