11 December 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती, तीही जिंकलो | सर्वसामान्यांनी महाविकासआघाडीला स्वीकारलं

Pune Nagpur Auragabad, MLC election result, NCP President Sharad Pawar

पुणे, ४ डिसेंबर: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार होते.

पुणे आणि नागपूर पदवीधर हे भारतीय जनता पक्षाचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. काँग्रेसचे वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भारतीय जनता पक्षाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Presindent Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धुळे, नंदुरबार निर्णय हा अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वीपासून होता. त्याचा विजय नव्हे, तो खरा विजय नाही. मागील वर्षभर आम्ही काम करून दाखवलं आहे. यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. ती कॉग्रेसने जिंकली. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकासआघाडीचा विजय (Victory of MahaVikas Aghadi Government) आहे. महाविकासआघाडी सरकारने एकत्र काम केले. त्याचे यश असून पुणे मतदार संघात ही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आला आहे. महाराष्ट्रतील चित्र बदललं आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

“भाजपा प्रदेशाध्यक्षांचा विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधान परिषदेला चंद्रकांतदादा कसे निवडून आले ते सर्वांना माहित आहे. तसेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला,” असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

 

News English Summary: NCP’s President Sharad Pawar has responded. “Dhule, Nandurbar decision is not surprising at all. They already had a large class in their hands. Not his victory, not his real victory. We have been working for the past year. In this, Nagarpu’s place was never found. She was won by Congress. This result in Maharashtra is a victory for the Mahavikasaghadi. The Mahavikasaghadi government worked together. It is a success and we could not get it in Pune constituency. But now even the common people have accepted the Mahavikasaghadi government. The result has been different from those we have accepted so far. The picture in Maharashtra has changed, ”said Sharad Pawar.

News English Title: Pune Auragabad MLC election result NCP President Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x