मूळ प्रश्न सोडून 'राम मंदिर' गंभीर विषय करणाऱ्या सेनेला मतदार अद्दल घडवू शकतो: सविस्तर
मुंबई : सध्या देशात विविध प्रश्नांनी शहरी आणि ग्रामीण जनता त्रासलेली आहे. त्यात वाढलेली महागाई, बेरोजगारी, दुष्काळ आणि उद्योगांचा घसरता आलेख असे एक ना अनेक गंभीर प्रश्न राज्यापुढे असताना केवळ आगामी निवडणुकीच्या उद्देशाने प्रेरित होऊन आणि मतदाराला गृहीत धरून राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा असल्याचे देखावे करणाऱ्या शिवसेनेबद्दल सामन्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य लोंकांना अशा विषयांमध्ये काहीच रस राहिलेला नसून केवळ याच विषयाला पुढे रेटणाऱ्या शिवसेनेविरुद्ध मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली.
त्यात उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना जागोजागी कार्यकर्त्यांनी आरत्यांचे आयोजन केले होते. त्या पाहून जाणाऱ्या येणाऱ्या लोंकाच्या चेहऱ्यावरील संताप स्पष्ट दिसत होता. शिवसेना संपूर्ण विषय हा केवळ जोशमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांच्या नजरेतून पाहत असली तरी लोकांच्या भावना खूप तीव्र असल्याचे आमच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले होते. वास्तविक जितका राग आज लोकांच्या मनात मोदी सरकारच्या फसव्या घोषणांबद्दल आहे, तितकाच तो सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेनबद्दल सुद्धा आहे, असा अनुभव जनमताचा कानोसा घेतल्यावर येत आहे.
शिवसेनेचे केंद्रात आणि राज्यात मिळून डझनभर मंत्री असताना सुद्धा विकास करण्यात ते पूर्णपणे फोल ठरले आहेत हा लोकांचा अनुभव झाला आहे. त्यामुळे मतदार हा केवळ भाजपच्या विरुद्धच चिडला आहे, अशा भ्रमात सध्या शिवसेना असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ नेत्यांनी अयोध्येतील आयोजन चांगले केल्यामुळे पक्ष नैतृत्व सुखावल असलं तरी मूळ मतदार प्रचंड नाराज झाला आहे असं चित्र आहे. सामन्यांना या धार्मिक राजकारणाचा वीट आल्याचे अनेकांनी मत व्यक्त केलं आहे.
सांगली महानगरपालिका आणि जळगाव महानगरपालिकेतील झालेली पक्षाची दैना बरंच काही सांगून जाते. त्यात मुंबईसारख्या शहरांवर राज्य असताना सुद्धा मुंबई को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत झालेलं पानिपत हे सुद्धा त्यातील एक उदाहरण आहे. पालघर लोकसभा पोट निवडणुकीत झालेला पराभव आणि मिळाली मत ही केवळ तिथल्या वनगा कुटुंबीयांची होती. विशेष म्हणजे या सर्व निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढवली नसताना सुद्धा पक्षाची अशी दैना झाली होती.
त्यानंतर पुन्हा निवडणूक जवळ येताच राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून मतदार अजूनच शिवसेनेवर चिडला असल्याचे पाहायला मिळत आहे. समाज माध्यमांवर सुद्धा केवळ शिवसौनिकच खुश दिसत असून सामान्यांच्या प्रतिक्रिया या अतिशय तीव्र असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी केलेल्या LIVE प्रदर्शनाने सामान्य लोकं शिवसेनेवर अजूनच चिडल्याचे दिसत आहे. एकूणच पक्ष आजच्या घडीला जरी वास्तव समजून घेणार नसेल तर मतदार मतपेटीतून त्यांना समजून देईल, असं प्रथम दर्शनी वाटतं आहे. नव्या पिढीला अशा विषयांमध्ये काहीच रस नसून ते वेगळ्याप्रकारे व्यक्त होण्याची अधिक शक्यता दुणावतो.
वास्तविक बाबरी पडल्यानंतर १९९२-९३ मध्ये झालेल्या जातीय दंगली देश आणि विशेषकरून महाराष्ट्र व मुंबई कधीच विसरणार नाही. त्याचाच फायदा त्यावेळी राज्यात युती सरकार सत्तेत येण्यास झाला होता. परंतु, त्यानंतर भाजप आणि शिवसेनेला याच विषयाची सत्तेत येण्यासाठी चटक लागल्याचे दिसत आहे. २०१४ मध्ये विकासाची स्वप्न दाखवत सत्तेत आले आणि विकास फोल ठरताच पुन्हा राम मंदिर पुढे करून मतांचा जोगवा मागण्यास सज्ज होत आहेत. परंतु, त्यात बेरोजगारी, महागाई आणि भीषण दुष्काळासारखे गंभीर विषय पडद्याआड झाकण्याचे शिस्तबद्ध प्रयत्न भाजप आणि शिवसेनेकडून सुरु आहेत. सामान्यांना याचा काहीच फायदा होणार नसून झालाच तर तो केवळ शिवसेनेला युती झाल्यास स्वतःच्या पदरात अधिक जागा पाडून घेण्यासाठी होईल असे चित्र आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News