24 September 2023 5:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

अडचणीत असलेल्या BSNL, MTNLचे विलिनिकरण होणार: केंद्राचा निर्णय

PM Narendra Modi, Modi Govt, MTNL, BSNL, Merger

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचं विलिनीकरण होणार आहे. आज झालेल्या केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या दोन्ही कंपन्या सरकार बंद करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. भूतकाळात बीएसएनएलवर मोठा अन्याय झाला. त्यामुळे बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाबरोबरच कामगारांच्या व्हीआरएसची योजनाही आखण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना व्हिआरएसचं आकर्षक पॅकेज देण्यात येणार आहे. व्हीआरएस योजनेनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचं वय ५३ वर्ष असेल तर त्याला वयाच्या साठीपर्यंत १२५ टक्के पगार मिळेल. व्हीआरएसचा अर्थ स्वेच्छेने निवृत्ती घेणं. याचा अर्थ जबरदस्ती नव्हे, असंही ते म्हणाले. याशिवाय ४जी स्पेक्ट्रमसाठी ४ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या ४ वर्षात ३८००० कोटी रुपये मोनेटाइज करण्यात येणार आहे. तसेच १५ हजार कोटींचे बाँड जारी करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत MTNL आणि BSNL या कंपन्यांच्या पुनरुज्जीवन योजनेला तसेच त्यांच्या विलिनिकरणाला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे यापुढे MTNL ही BSNLची सहाय्यक कंपनी म्हणून काम करेल. मात्र, या दोन्ही कंपन्यांच्या विलिनिकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपन्यांना 4G स्पेक्ट्रमचे वाटप करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली असून या दोन्ही कंपन्यांमधील मनुष्यबळ कमी करण्यासाठी स्वेच्छा निवृत्तीचे आकर्षक पॅकेजही जाहीर करण्यात आल्याचीही घोषणा त्यांनी केली.

सध्याच्या घडीला BSNL मध्ये तब्बल १.६५ लाख कर्मचारी आहेत. गेल्या काही काळापासून MTNL आणि BSNL सातत्याने तोट्यात आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले होते. या दोन्ही कंपन्यांकडे ४ जी स्पेक्ट्रमच्या लहरी नसल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत त्या मागे पडल्या होत्या. मात्र, तरीही MTNL आणि BSNL च्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे. परंतु, केंद्राने आता या दोन्ही कंपन्यांना ४ जी स्पेक्ट्रम उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे MTNL आणि BSNL चा व्यवसाय आणखी वाढू शकतो.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x