29 April 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

Zero Cost EMI | नो-कॉस्ट ईएमआय म्हणजे काय रे भाऊ? वस्तू खरेदी करताना त्याचा उपयोग काय? समजून घ्या गणित

Zero cost EMI

Zero cost EMI  | शॉपींग मॉल किंवा एखाद्या मोठ्या शोरुममध्ये तुम्ही नो-कॉस्ट ईमआय असे कधीनाकधी ऐकले अलेस. अनेक जण याचा वापरही करत असतील. मात्र या विषयी काहीच माहिती नसलेल्या व्यक्तींना वाटते की, या मार्फत आपल्यासा येथील सेवा फ्री पुरवली जाणार आहे. जर तुम्ही देखील असा विचार करत असाल तर ते चूक आहे. कारण आजच्या काळात असे कधीच होत नाही. कोणताचा उद्योजक आपली वस्तू फूकटात देत नाही. जेव्हा तुम्हाला फ्री काही मिळत असते तेव्हा तुम्ही स्वत:च एक प्रोडक्ट असता.

दिवाळी किंवा अन्य साणांमध्ये वस्तूंवर छान छान ऑफर ठेवलेल्या असतात. यात घरातील उपकरणे आणि कामात लागणारे संगणक लॅपटॉप अशा सर्व वस्तू लोक ऑफर आली की खरेदी करतात. अशात अनेक ठिकाणी नो-कॉस्ट ईएमआय हा पर्याय देखील असतो. मात्र याचा वापर करावा की नाही हे आपल्यावर अवलंबून असते. जर तुम्ही याचा वापर केला तर त्या मुसार किंमतीत तुम्हाला आणखीन सुट मिळते. याचा वापर करणे अनेकदा फायद्याचे ठरते मात्र काहींचे नुकसान देखील होते.

नो-कॉस्ट ईएमआय म्हणजे काय?
नो-कॉस्ट ईएमआय म्हणजे ग्राहकांना कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर त्यावर बिल भरताना लागणारे व्याज कमी करणे अथवा त्यात सुट मिळवून देणे होय. नवनविन उपकरणे किंवा इतर गरजेच्या इलेक्ट्रॉनीक वस्तू खरेदी करताना नेहमीच याचा वापर केला जातो. मात्र याचा वापर करुण वस्तू खरेदी करण्याआधी त्याचे नियम आणि अटी आपल्याला निट माहीत असणे फार गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही नो-कॉस्ट ईएमआय हा पर्याय निवडता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही दर  महा या वस्तूची रक्कम कोणत्याही व्याजाशीवाय भरणार आहात. व्याजाची जी अतिरीक्त रक्कम आहे ती तुम्ही भरणार नाही असा याता अर्थ आहे. मात्र खरोखर तसे होते का?  हे समजून घ्या.

बॅंकेपासून नो-कॉस्ट ईएमआय असतो वेगळा
अनेक बॅंका त्यांच्या विविध स्कीमवर ही सुविधा देतात. तर काही ठिकाणी झिरो डाउन पेमेंटची सुट असते. यात तुम्हाला त्यावेळी पैसे खर्च करण्याची गरज नसते. तुम्ही मासीक हप्ते भरून ती वस्तू मिळवू शकता. तर काही बॅंका डाउन पेमेंटसाठी विशिष्ठ रक्कम घेतात आणि इतर पैसे ईएमआय मार्फत भरले जातात.

नो-कॉस्ट ईएमआय घेताना हे लक्षात ठेवा
* नो-कॉस्ट ईएमआय स्विकारताना तुम्ही विविध रिपेमेंट सायकल निवडी शकता. याचा कालावधी ३ ते २४ महिन्यांचा असू शकतो.
* यात तुम्हाला व्याजाचे पैसे भरावे लागत नाहीत. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त मुळ रकमेचेच पैसे भरू शकता.
* तुम्हाला अशा वेळी इतर टॅक्स भरावे लागतात.
* अनेक ठिकाणी नो-कॉस्ट इएमाय शुल्क भरावे लागते. ब-याचदा त्याची किंमत तुमच्या वस्तूवर लागणा-या व्याजाच्या किंमती एवढी असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Zero cost EMI What is No-Cost EMI What is its use while buying goods 29 October 2022.

हॅशटॅग्स

Zero cost EMI(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x