20 September 2021 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली | पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता
x

बेस्ट संप: मनसे रस्त्यावर उतरली, कोस्टल रोडचं काम बंद पाडलं, पहिला दणका सत्ताधाऱ्यांना

मुंबई : बेस्ट संपावर तोडगा न काढल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे आणि पहिला दणका कोस्टल रोडच्या बांधकामाला आणि काँट्रॅक्टरला दिला आहे. कालच मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे रस्त्यावर उतरली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

वरळी येथे सुरु असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने विरोध दर्शवला आहे तसेच मनसे कार्यकर्त्यांनी काम करणारे काँट्रॅक्टरचे कर्मचारी तसंच तेथील सर्व मशीन्स हलवण्यास भाग पाडून त्यांना हुसकावून लावले आहे. तसेच बाजूच्या तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या कार्यालयांना सुद्धा टाळं ठोकलं आहे. त्यामुळे जर सत्ताधारी शिवसेनेला संप मिटवता येत नसेल तर, तोपर्यंत कोस्टल रोडचं सुरु करु देणार नाही असा थेट इशारा सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान आज स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी ११ वाजता मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. बेस्ट संपाचा आज सलग ७वा दिवस असून मुंबईकर मात्र चांगलेच हैराण झाले आहेत.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(707)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x