दहावीचा रद्द झालेल्या भूगोल पेपरचे गुण कसे देणार? बोर्डाकडून स्पष्टीकरण
पुणे, २७ मे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. पण दहावीचा निकाल लावताना रद्द झालेल्या भुगोलाच्या पेपरचे गुण कसे देणार असा प्रश्न पालकांना पडला होता. त्यावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण देण्यात येणार आहेत. आता इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून भूगोल विषयाला गुण दिले जाणार आहेत. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यशिक्षण विषयाचे गुणही सरासरीनुसार मिळणार आहेत.
राज्यात दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० दरम्यान नियोजित होती. नियोजित वेळापत्रकानुसार सर्व परिक्षा पार पडल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने भुगोलाचा पेपर स्थगित करण्यात आला होता. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा पेपर रद्द करत असल्याची घोषणा केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२० माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा दि. मार्च २०२० ते २३ मार्च २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र राज्यात करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार २३ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आलेली सामाजिक शास्त्रे पेपर-२ (भूगोल) या विषयाची लेखी परीक्षा आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेली दिव्यांग विद्यार्थांच्या कार्यशिक्षण या विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा रद्द केलेल्या विषयांना पुढीलप्रमाणे गुणदान करण्यात येणार आहे.
सामाजिक शास्त्रे पेपेर-२ (भूगोल) या विषयाचे गुणदान हे उमेदवाराने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अऩ्य विषयांच्या लेखी,तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन/तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.
News English Summary: Class X geography paper was canceled due to corona outbreak. But the parents had a question as to how they would give the marks of the canceled geography paper while deciding the tenth. The State Board of Secondary and Higher Secondary has made an important announcement on this. Tenth grade students will be given average marks in Geography.
News English Title: Announcing The Decision Regarding The Marks Of The Geography Subject Of Class X News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News