15 May 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

आमदारकीचा कार्यकाळ संपल्याने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा

मुंबई : शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा म्हणजे विधानपरिषद आमदारकीचा कालावधी आज संपणार आहे. दरम्यान, मी पक्षावर नाराज नाही, परंतु शिवसेनेत मला एखादी नवीन जबाबदारी दिली जाईल अशी आशा आहे, असं त्यांनी प्रसार माध्यमांकडे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, दीपक सावंत यांची जागा खाली झाल्याने आणि ही जागा शिवसेनेच्या कोट्यात असल्याने त्याजागी कोणाची वर्णी लागणार ते पाहावं लागणार आहे. या पदासाठी सध्या शिवसेनेत जोरदार फिल्डिंग लागल्याचे वृत्त आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून आदित्य ठाकरेंच्या समर्थकांची वर्णी लागल्याने आणि त्यांनी दीपक सावंत यांना कडाडून विरोध केल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात होते. तेव्हापासूनच सावंत पक्षावर नाराज असल्याचे वृत्त पसरले होते. समजले होते. जाणीवपूर्वक पत्ता कापण्यात आल्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी ४ जुनला आमदारकीचा राजीनामा दिला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x