
NBCC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पसरली होती. मंगळवारी मात्र शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरू झाली. आज देखील शेअर बाजारात सुरुवातीच्या काही तासात तेजी निर्माण झाली, मात्र आता पुन्हा एकदा गुंतवणूकदारांनी नफा वसुली करायला सुरुवात केली आहे. तेजी-मंदीच्या काळात शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी 4 शेअर्स निवडले होते. या शेअर्सनी आपली टार्गेट प्राइस स्पर्श करू गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण या शेअर्सबद्दल सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत.
एबीबी इंडिया लिमिटेड :
16 फेब्रुवारी रोजी तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 4482 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. आणि 50 टक्के वाढीच्या अंदाजासह हा स्टॉक 6000 रुपये टार्गेट प्राइससाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला होता. या स्टॉकने आपली टार्गेट प्राइस पार केली आहे. या कंपनीचे शेअर्स 13 मे 2024 रोजी 8000 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 8,053.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड :
21 जानेवारी रोजी तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 94 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. या स्टॉकवर तज्ञांनी शॉर्टटर्म टारगेट 140 रुपये आणि दीर्घकालीन टार्गेट 200 रुपये निश्चित केली होती. 13 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 130 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के घसरणीसह 135.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेड :
21 एप्रिल रोजी तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 1550 रुपये किमतीवर खरेदी करून 2000 रुपये टार्गेट प्राइससाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला होता. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 1250 रुपये ते 1300 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. सोमवारी या कंपनीच्या शेअर्सने 2282 रुपये किंमत स्पर्श केली होती. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 2,493.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
डीएलएफ लिमिटेड :
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तज्ञांनी डीएलएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 680 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. यावर तज्ञांनी 762 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. तज्ञांच्या मते, आता हा स्टॉक 1000 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सोमवारी या कंपनीच्या शेअर्सने 841 रुपये किंमत स्पर्श केली होती. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के घसरणीसह 832.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.