27 July 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

मग होऊ दे JPC'; 'शिवसेनेलासुद्धा मोदी सरकारवर संशय

नवी दिल्ली : राफेल करारावरुन आज लोकसभा सभागृहात काँग्रेसने मोठा गदारोळ केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही जेटलींना यासंदर्भात प्रश्न विचारले. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसल्याचं खासदार सावंत यांनी म्हटलं आणि अप्रत्यक्षरित्या भाजप व मोदी सरकारवरच संशय व्यक्त केला.

संसद सभागृहात यूपीएच्या काळात झालेला १२६ विमानांचा करार मोदी सरकारने ३६ विमानांवर का आणला? तसेच या लढाऊ विमानांची किंमत अचानक एवढी कशी वाढली? आणि ४५,००० कोटींचं कर्ज असणाऱ्या अनिल अंबानींना हे कंत्राट कसं काय देण्यात आलं? मोदी सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ? असा प्रश्न शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता ? केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का ?. याउलट एचएएलकडे सर्वच असतानाही एचएएलला काँट्रॅक्ट का दिलं नाही, असे अनेक संशय व्यक्त करणारे प्रश्न शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केले आणि मोदी सरकारला कात्रीत पकडले आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x