13 December 2024 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

पेगॅसस स्पायवेअर | राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली तुम्ही मागे फिरू शकत नाही, पत्रकार आणि सेलिब्रिटींची हेरगिरी गंभीर - सुप्रीम कोर्ट

Pegasus spyware

नवी दिल्ली, १३ सप्टेंबर | इस्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरचा गैरवापर करून पत्रकार, न्यायाधीश, राजकीय नेते यांच्यावर सरकारने पाळत ठेवल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर प्रतिसाद देण्यास सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला अधिक काळ दिल्याचे म्हणत या प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी १७ ऑगस्ट रोजी केंद्राला पेगॅसस प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकांना उत्तर देण्याबाबत एक नोटीस जारी केली होती. यावर सोमवरी सुनावणी झाली. यावेळी सुनावणीत केंद्र सरकारने तपासासाठी एक पॅनल तयार करण्यास तयार आहे असे सांगितले आहे.

पेगॅसस स्पायवेअर, केंद्राने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास नकार दिल्याने सुप्रीम कोर्टाने केंद्राला धारेवर धरले – Solicitor General says the Central Govt does not want to file an affidavit on the use of Pegasus spyware :

सुनावणीत केंद्र सरकारने स्पष्ट केले की ते या प्रकरणावर प्रतिज्ञापत्र दाखल करणार नाही. याचे कारण स्पष्ट करताना केंद्राने सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करता येत नाही. पण सरकारने हेरगिरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे. तूर्तास न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. येत्या २-३ दिवसात यावर निर्णय दिला जाणार आहे.

न्यायालयात सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश रमण यांनी सरकारला या प्रकरणावरुन फटकारले आहे. सरकार या प्रकरणावर काय करत आहे हे न्यायालयाला जाणून घ्यायचे आहे, सरन्यायाधीश रमण यांनी म्हटले. आधीच्या सुनावणीत केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दोनदा वेळ घेतला होता, पण आता त्यांनी सरळ नकार दिल्याने सरन्यायाधीश रमण यांनी सरकारला धारेवर धरले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Solicitor General says the Central Govt does not want to file an affidavit on the use of Pegasus spyware.

हॅशटॅग्स

#Pegasus(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x