14 February 2025 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक मध्ये मोठी घसरण होऊ शकते - NSE: GTLINFRA NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमधील घसरण थांबेना, 6 महिन्यात 32% घसरला, पुढे काय होणार - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर रेल्वे कंपनी शेअर 6 महिन्यात 33% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: RVNL EPFO Passbook | खाजगी पगारदारांसाठी खुशखबर, EPF व्याजदर वाढणार, 7 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, दुप्पट होतील पैसे, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | 48 रुपयांचा इन्फ्रा कंपनी शेअर ६ महिन्यात 22% घसरला, विश्लेषकांनी काय म्हटलं - NSE: IRB
x

कोरोना विरोधी लढ्यात अजून एका पोलिसाचं बलिदान

Corona Crisis, Covid 19, Mumbai Police

मुंबई, २६ एप्रिल:  राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शनिवारी एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली. शनिवारी ८११ नागरिक बाधित आढळल्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ७६२८ झाला आहे. तर, आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

तत्पूर्वी मुंबईत एका ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी इथला रहिवासी होता. त्यामुळे मागील २४ तासात २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

संंबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत ९६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ९६ पोलिसांत १५ अधिकाऱ्यांचा आणि ८१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली.

 

News English Summary: The number of corona patients in the state is increasing day by day and on Saturday, the highest ever increase was recorded in a single day. The number of victims in the state has risen to 7,628 as 811 civilians were found infected on Saturday. So far, 232 people have died.

News English Title: Story one more Mumbai Police constable dead due to covid 19 News Latest Updates.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x