9 May 2021 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
इतिहास घुसमटला | दिल्ली इंडिया गेटच्या श्वास आणि देशवासीयांचा श्वास एकाच वेळी घुसमट आहे कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा केंद्र सरकारचा ढिम्म कारभार | अखेर सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना अमेरिकन संस्थेच्या इशाऱ्यानुसार भारतात ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू झाल्यास त्याला मोदी सरकारचं जबाबदार असेल - द लॅन्सेट संपादकीय
x

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या नाहक बदनामीचा प्रयत्न | भाजपवर षडयंत्राचा आरोप

NCP leader Mehboob Sheikh, NCP Mahesh Tapase, Rape allegations

मुंबई, ३१ डिसेंबर: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महेबूब शेख यांच्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी शेख यांनी संपर्क केला व आपण सर्वप्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत असे कळविले. काही तथ्य आढळल्यास मला शिक्षा करा अशीदेखील विनंती तपास अधिकार्‍यांकडे केल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाने राजकीय फायदा उठवण्यासाठी कालपासून महेबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्या वर्षभरापासून कार्यरत असताना वेळोवेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र काही विरोधी राजकीय नेतेमंडळी करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे.

दरम्यान मेहबूब शेख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, “गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडून मिळाली. यानंतर मी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करुन माहिती घेतली. तपास अधिकाऱ्यांना फोन करुन माझी तक्रारदार तरुणीशी काहीच ओळख नसून कधीही भेटलो नाही अशी माहिती दिली. माझे फोन रेकॉर्ड तपासा, हवं तर नार्को टेस्ट करा असं सांगितलं”.

 

News English Summary: State President of Nationalist Youth Congress (NYC), Mehboob Sheikh, has been accused of making baseless allegations and has demanded a narco test from the police. However, NCP chief spokesperson Mahesh Tapase alleged that the BJP was conspiring for political gain.

News English Title: NCP leader Mehboob Sheikh on rape allegations news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(156)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x