24 April 2024 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

ग्रामपंचायत रणधुमाळी | आ. रोहित पवार आणि राम शिंदे पुन्हा आमनेसामने

NCP MLA Rohit Pawar, BJP leader Ram Shinde, Gram Panchayat

नगर, ३१ डिसेंबर: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातही ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 30 लाखांचे बक्षीस जाहीर केलं आहे.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या फॉर्मुल्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. राम शिंदे यांनी रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार आणि माजी आमदार राम शिंदे हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

“गावात गटतट असावेत असावे असा प्रामाणिक हेतू त्यांचा असावा मात्र माझा हेतू गटतट नसावेत असा आहे. गावच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र येत असतील तर त्याला काय हरकत आहे”, असा सवाल त्यांनी राम शिंदे यांना केला.रोहित यांच्या प्रलोभनाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी राम शिंदे यांनी केली होती.

त्यानंतर “बक्षीस जाहीर करण्यापाठीमागे माझा प्रामाणिक हेतू होता की गावकऱ्यांनी तट तट विसरुन विकासाचं राजकारण करावं. त्यांना विकासचं काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करु”, असा टोला रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला. एकतर राम शिंदे काय बोलतात त्यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे, असा टोला लगावत लोकांच्या हिताच्या दृष्टीनेच मी या पुढे काम करत राहील, असं रोहित पवार म्हणाले.

 

News English Summary: The Gram Panchayat elections are in full swing in the state. In Karjat-Jamkhed constituency also, the campaign for Gram Panchayat elections is in full swing. NCP MLA Rohit Pawar has announced a prize of Rs 30 lakh for holding Gram Panchayat elections without any objection. On the other hand, former BJP MLA Ram Shinde has strongly objected to Rohit Pawar’s formula. Ram Shinde has hit Rohit Pawar hard. Therefore, MLA Rohit Pawar and former MLA Ram Shinde have come face to face once again.

News English Title: NCP MLA Rohit Pawar and BJP leader Ram Shinde criticised each others over on Gram Panchayat election issue news updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x