7 July 2020 8:06 PM
अँप डाउनलोड

सुप्रीम कोर्टाने तंबी देताच ते काश्मिरी तरुण सभ्य झाले, काल जय जयकार केलेल्या युवासैनिकांची हकालपट्टी

Udhav Thackeray, Shivsena, Aditya Thackeray

मुंबई : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेत आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. गुरूवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

वास्तविक काश्मीरमध्ये राहणारे सर्वच दहशदवाद्यांचे समर्थक असतात असा जावईशोध देखील या युवा सैनिकांनी लावला असावा. त्यात हिंदुस्थान जिंदाबादचे नारे देण्यास सांगितले तेव्हा, त्या तरुणाने छातीवर हात ठेवत सौम्यपणे उत्तर देखील दिलं (छातीवर हात ठेवत) की हिंदुस्थान जिंदाबाद तो दिल से आता है, परंतु या युवासैनिकांनी केलेला हा प्रकार आदित्य ठाकरे यांना अजिबात रुचलेला नाही.

वाघापूर परिसरातील वैभवनगर येथे बुधवारी रात्री युवासेनेच्या १०-१२ कार्यकर्त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुलवामा येथे झालेल्या दहशत वादी हल्ल्यानंतर देशात काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडून आले. यवतमाळ येथे या प्रकराचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. आपला लढा दहशतवाद्यांशी आहे, निष्पाप काश्मीरी तरूणांसोबत नाही असे सुनावत यानंतर अचारसंहितेचे नियम पाळून काम करा असे आदित्य ठाकरे म्हटले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(887)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x