मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेत आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. गुरूवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.

वास्तविक काश्मीरमध्ये राहणारे सर्वच दहशदवाद्यांचे समर्थक असतात असा जावईशोध देखील या युवा सैनिकांनी लावला असावा. त्यात हिंदुस्थान जिंदाबादचे नारे देण्यास सांगितले तेव्हा, त्या तरुणाने छातीवर हात ठेवत सौम्यपणे उत्तर देखील दिलं (छातीवर हात ठेवत) की हिंदुस्थान जिंदाबाद तो दिल से आता है, परंतु या युवासैनिकांनी केलेला हा प्रकार आदित्य ठाकरे यांना अजिबात रुचलेला नाही.

दरम्यान, पुलावामा हल्ल्यानंतर देशात कश्मिरी तरुणांवर हल्ले झाले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायलायने मुख्य सचिव आणि ११ पोलीस महासंचालकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर प्रकरण शेकण्याची शक्यता निर्माण झाल्याने, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्षाकडून प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटवरून प्रसार माध्यमांना लक्ष केलं असून, आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी ट्विट करून केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे, ‘जम्मू-काश्मीरमधील काही विद्यार्थ्यांसोबत यवतमाळमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. शिवसेनेने काल एक प्रेस नोट प्रसिद्ध केली होती, जी आज छापली गेला नाही, कदाचित आमच्या कडक कारवाईकडे दुर्लक्ष करून या प्रकरणास जाणीवपूर्वक चिघळवणे किंवा आम्हाला बदनाम करणे’ असंच असावं’ असं त्यांनी ट्विट केलं आहे.

वाघापूर परिसरातील वैभवनगर येथे बुधवारी रात्री युवासेनेच्या १०-१२ कार्यकर्त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुलवामा येथे झालेल्या दहशत वादी हल्ल्यानंतर देशात काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडून आले. यवतमाळ येथे या प्रकराचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. आपला लढा दहशतवाद्यांशी आहे, निष्पाप काश्मीरी तरूणांसोबत नाही असे सुनावत यानंतर अचारसंहितेचे नियम पाळून काम करा असे आदित्य ठाकरे म्हटले आहे.

Yuvasena workers yesterday beaten to kashmiri students and aditya thackeray talked about press note