19 July 2019 9:53 AM
अँप डाउनलोड

प्रकाश आंबेडकरांमुळेच लोकसभेत एकही जागा निवडून आली नाही: लक्ष्मण माने

प्रकाश आंबेडकरांमुळेच लोकसभेत एकही जागा निवडून आली नाही: लक्ष्मण माने

मुंबईः राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगाने घटना घडत आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतं खाऊन काँग्रेसला नुकसान पोहोचवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांवर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. त्यासाठी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत लक्ष्मण मानेंनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे भविष्यत मी प्रकाश आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही.

पुढे ते असं म्हणाले की प्रकाश आंबेडकरांमुळेच लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एक देखील जागा राज्यभरात निवडून आली नाही. आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीत सामील करून घेतलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा दुरुपयोग करत आहेत. संघ आणि संघ परिवाराच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडी व्यापून टाकली आहे. त्यामुळे सध्याची वंचित आघाडी ही बहुजनांची नव्हे, तर मुख्यत्वे उच्चवर्णीयांची झाली आहे. वंचित बहुजन आघाडी ही आमची खरी ओळख असायला हवी. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी उचलून धरली आहे. राज्यभर आम्ही खपलोय. पदरचे पैसे घालून काम केलंय. हे आयत्या बिळावरचे नागोबा असल्याचं म्हणत त्यांनी पडळकरांना लक्ष्य केले आहे.

मी डॉ. बाबासाहेबांच्या तत्त्वापासून कधीच चुकलो नाही, असंही लक्ष्मण माने म्हणाले आहेत. यावेळी लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचं महासचिवपद दिल्यानं प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीत प्रसार माध्यमांशी बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-एनसीपी किंवा इतर पक्षांशी आघाडी करायला हवी होती. लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे त्यांच्या तब्बल १० जागा पडल्या आहेत. प्रतिगामी पक्षांना मदत हा अधःपात होता आणि तो माझ्याकडून झाला. त्याचा मला प्रचंड पश्चात्ताप देखील आहे. आम्ही स्वतःच्या खिशातील पैसे घालून आम्ही काम केलं. मी गोपीचंद पडळकर यांचं नाव सुचवलं, पण वास्तविक ते अध्यक्षांनी स्वतःच आधी माझ्याकडून वदवून घेतलं होतं. लाल दिव्याच्या गाड्या ओवाळून टाकल्यात, असंही लक्ष्मण माने म्हणाले आहेत. आंबेडकरवाद्यांच्या कळपात संघाचे लोक कशाला?, असा प्रश्नही लक्ष्मण मानेंनी उपस्थित केला आहे.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(48)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या