Sameer Wankhede | अजून एका पंचाचा समीर वानखेडेंवर धक्कादायक आरोप | खोट्या केसेस उभ्या करतात
मुंबई, 27 ऑक्टोबर | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा पाय आता अधिक खोलात जाऊ लागला आहे. कारण आर्यन खान ड्रग्स प्रकरणात प्रभाकर सईल या साक्षीदाराने आरोप केलेले असताना आता दुसरीकडे एनसीबीने कारवाई केलेल्या आणखी एका जुन्या प्रकरणातील साक्षीदाराने समीर वानखेडे आणि एनसीबीवर अत्यंत गंभीर (Sameer Wankhede) आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी तर वाढल्याच आहेत. पण याचसोबत NCB च्या एकूणच कामाच्या शैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Sameer Wankhede, Zonal Director, Narcotics Control Bureau, Mumbai, is now getting deeper. While Prabhakar Sail has made allegations in Aryan Khan Drugs case, now another old witness in NCB has made very serious allegations against Sameer Wankhede and NCB :
नेमकं प्रकरण काय?
खारघरमधील 80/2021 या केसमध्ये एका नायजेरियनला पकडण्यात आलं होतं. त्याचेकडे ड्रग्स सापडलेच नव्हते. ज्या व्यक्तीकडे ड्रग्स सापडले होते तो पळून गेला होता. पण एनसीबीने कारवाई करताना भलत्याच व्यक्तीला पकडून आरोपी म्हणून दाखवलं होतं. याच प्रकरणात साक्षीदार म्हणून माझ्या देखील कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या होत्या.’ असा गंभीर आरोप शेखर कांबळे याने केला आहे.
शेखर कांबळे यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नेमकं काय आरोप केले?
मी फसलो गेलो आहे. एक खारघरच्या केसमध्ये एक नायजेरियन पकडला गेला. खरं तर तो नायजेरियन ड्रग्स पेडलर नव्हता. ज्या कारवाईसाठी आम्ही गेलो तिथे जो मुळात ड्रग्स पेडलर नायजेरियन होता तो धक्का मारून पळून गेला होता. त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे 40 ते 50 नायजेरियन होते.
‘त्या इमारतीवर धाड मारली तेव्हा तिथून सगळे नायजेरियन बाहेर पडले. त्यावेळी दोन नायजेरियन एनसीबीच्या हाती लागले. त्यात एक छोटा मुलगा होता आणि एक मोठा नायजेरियन व्यक्ती होता. या दोघांना ऑफिसमध्ये नेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी छोट्या मुलाला सोडून देण्यात आलं. पण ज्या नायजेरियनला पकडलं गेलं त्याच्याकडे ड्रग्स सापडलं नव्हतं. तरीही त्याच्याकडे 60 ग्रॅम ड्रग्स सापडलं असं यांनी दाखवलं आहे.’
‘या छाप्यानंतर 3 दिवसांनी कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेण्यात आल्या. जवळजवळ 10-12 कागदावर या सह्या घेण्यात आल्या. मी त्यांना विचारलं पण की, तुम्ही माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेत आहात. तुम्ही मला पंचनामा दाखवा. मी वाचून सही करतो. तर ते म्हणाले की, आम्ही ते नंतर लिहतो. ते तू फक्त सही कर. मी फक्त त्याच्यावर सही केलेली आहे. त्यावर माझी आणि माझ्या मित्राने सही करुन आम्ही तिथून निघून आलो.’
‘एनसीबी अधिकाऱ्याने जे निनावी पत्र पाठवलं होतं ते मी काल वाचलं.. माध्यमांमधून ते लेटर समोर आलं आहे. तेव्हा त्या लेटरमध्ये याच केसचा (80/2021 केस) उल्लेख होता. उद्या जर मला कोर्टात बोलावलं गेलं साक्षीला पंच म्हणून तर मी काय उत्तर देणार? कारण तो पंचनामा मी वाचलेलाच नाही. मला काही माहितीच नाही. मी जर कोर्टासमोर चुकीचा ठरलो तर उद्या कोर्ट मला शिक्षा सुनावेल.’
‘मी त्यांना त्या दिवशीच मागणी केली होती की, मला पंचनामा वाचण्यासाठी दाखवा. तर ते म्हणालेले की, तू काहीही काळजी करु नको. पंचनामा आम्ही लिहतो. तू फक्त सही कर. त्यामुळे एनसीबी बोगस कारवाया करतं हे समोरच आलं आहे. कारण प्रभाकर सईल जेव्हा बोलला त्यानंतर मला पण या सगळ्याची भीती वाटायला लागली. माझ्याकडून त्यांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आहेत.’
‘उद्या ते पण मला अडचणीत आणू शकतात. मला रात्री एक फोन आला होता आणि मी त्यांच्याशी बोललो देखील आहे. अनिल माने यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांना मी तेच सांगितलं की, सर.. असं असं झालं आहे. तर ते म्हणाले की, ते लेटर मीच अजून वाचलं नाही. त्यामुळे मला यातलं काही माहिती नाही. मी म्हणालो की, सर माझ्या पण तुम्ही अशाच प्रकारे कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आहेत आणि नायजेरियन आपण दुसराच पकडलेला आहे. तर मला म्हणाले की, तू कुणाला काय बोलू नको. जे पण आहे उद्या ये ऑफिसला.. आम्ही तुला सांगू काय बोलायचं ते.’
‘मला समीर वानखेडे सरांनी पण अनेकदा फोन केलेला आहे. आता 10 ते 15 दिवसांपासून मला फोन येणं बंद झालेलं आहे. अनिल माने सरांचे देखील कॉल बंद आहेत. 19 तारखेच्या आधीपासून हे अधिकारी कॉल करणं बंद झाले आहेत. आता काल रात्री माझी त्यांच्याशी बातचीत झाली तेवढीच.
याआधी समीर वानखेडेंचे कॉल यायचे. नायजेरिअन पाहिजे.. नायजेरिअन कुठे ड्रग्स विकतो बघ. यासाठी त्यांचे माझे कॉल झालेले आहेत. मी चौकशीसाठी तयार आहे. त्यामुळे जे आहे ते मी सत्य सांगेन.’ असे गंभीर आणि खळबळजनक आरोप शरद कांबळे याने केले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकाराबाबत एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडेंवर काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Sameer Wankhede again on radar after one more Panch made allegations of fake cases.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या