मुंबई: आता दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालवायचं का? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. काल संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डबाबत विधान केलं होतं. यामध्ये इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायला मुंबईत येत होत्या, याचसोबत मंत्रालयात अंडरवर्ल्डचे गुंड येत जात असायचे, असं देखील संजय राऊत म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला फैलावर घेत काही गंभीर सवाल उपस्थित केलेत. काँग्रेसने संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं असं देखील फडणवीस म्हणतायत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी समर्थन देणार का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ‘अंडरवर्ल्ड गुंड छोटा शकील आणि दाऊद हे त्यावेळी मुंबई चालवायचे हे खासदार संजय राऊतांचं विधान खरं आहे का? पोलीस कमिश्नरांची निवड अंडरवर्ल्ड डॉनच्या सांगण्यानुसार होत असे अशा भयानक विधानांवर काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं’, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘तुम्ही ज्यांच्यासोबत सत्ता चालवता, त्यांचे एक वरिष्ठ नेते असं वक्तव्य करतात. सत्तेशी तुमची अशाप्रकारे सौदेबाजी झाली आहे का? की तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर झालेल्या आरोपांना तुम्हाला उत्तरही देता येत नाहीये. काँग्रेसने अधिकृत उत्तर न दिल्यास संजय राऊत यांचे दावे खरे मानले जातील’ असं फडणवीसांनी सुनावलं.

छोटा शकील, दाऊद हे महाराष्ट्रातलं राज्य चालवायचे हे खरंय का?, याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. १९६० ते १९८० या दोन दशकांमध्ये मुंबईच्या पोलीस कमिश्नरची अपॉइंटमेंट अंडरवर्ल्ड करायचा, या खुलाशावरही काँग्रेसनं उत्तर द्यायला हवं. अशाच प्रकारे अंडरवर्ल्डच्या माध्यमातून सीपींची नेमणूक व्हायची, याबद्दल खुलासा केला पाहिजे. हाजी मस्तान आणि अंडरवर्ल्डची लोक मंत्रालयात यायची आणि सेलिब्रिटींसारखं त्यांचं स्वागत केलं जायचं हे खरं आहे का? यावरही काँग्रेसनं स्पष्टीकरण द्यावं.

 

Web Title:  It true Shivsena MP Sanjay Raut talked about meeting former PM Indira Gandhi Karim Lala opposition leader Dadnavis asked 5 questions to congress.

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का?; फडणवीसांचा काँग्रेसला सवाल