25 April 2024 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल
x

ईशान्य मुंबई: जोरदार शक्तिप्रदर्शन करत संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

NCP, Sharad Pawar, Sanjay Dina Patil

मुंबई : किरीट सोमैया आणि शिवसेनेच्या वादात ईशान्य लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर गैरव्यवहाराचे वैयक्तिक आरोप केल्याने किरीट सोमैया यांचा पत्ता कट करत भाजपाने मुलुंडचे नगरसेवक मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने माजी खासदार संजय दीना पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी प्रचारात देखील आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, काल संजय दीना पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक काँग्रेस आणि मनसेचे पदाधिकारी देखील हजर होते. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत कलह मनोज कोटक यांचा मार्ग अवघड करू शकतो असं म्हटलं जात आहे. दरम्यान, अल्पसंख्यांक आणि मराठी मतदारांवर संजय पाटील यांची मदार असणार असून इतर भाषिकांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिल्यास ते पुन्हा २००९ मधील इतिहास रचतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ईशान्य मुंबईच्या पट्यात संजय दीना पाटील यांच्यासाठी आक्रमक कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याने त्याचा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. दरम्यान, अर्थशक्ती मध्ये दोन्ही बाजू म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी सारखेच तुल्यबळ असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात त्यांना स्थानिक मनसे पदाधिकारी आणि त्याच्या मतदाराची चांगली साथ मिळाल्यास त्यांचा विजय सुकर होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. तर मनोज कोटक यांची सर्वात मोठी शक्ती ही मुलुंड पट्यातील गुजराती मतदारांवरच अवलंबून असणार आहे यात वाद नाही. तसेच स्वतः किरीट सोमैया आणि ईशान्य मुंबई पट्यातील भाजप आमदार त्यांच्यासाठी काम करणार की छुप्यापद्धतीने त्यांच्या विरोधात ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x