14 December 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करा

Minister Bacchu Kadu, BJP MP Raosaheb Danve, Controversial statement, protesting farmers

मुंबई, १० डिसेंबर: “रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” अशी घणाघाती टीक राज्यमंत्री बच्चू कडू (MahaVikas Aghadi Minister Bacchu kadu) यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे (BJP MP Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

“रावसाहेब दानवे यांचे म्हणणे दुर्दैवी आहे. त्यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे; की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने औरंगाबादेत रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर बुधवारी आंदोलन करण्यात (Bacchu kadu criticizes Raosaheb Danve on his controversial statement) आले. यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, दानवे यांच्या घरासमोर रक्तदान करुन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घरासमोर बसून घोषणाबाजी केली. यावेळी दानवे यांच्या घरासमोर पोलीसही तैनात करण्यात आले होते.

रावसाहेब दानवेंनी काय म्हटलं आहे.
“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.

 

News English Summary: “The DNA of Raosaheb Danve belongs to Hindustan, that it has to be checked once in Pakistan,” said Minister of State Bacchu Kadu. He was speaking in Mumbai. This time he took note of the statement made by Raosaheb Danve (BJP MP).

News English Title: Minister Bacchu Kadu slams BJP MP Raosaheb Danve over controversial statement protesting farmers news updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x