16 April 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
x

पुढची विधानसभा महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजपचे ५० आमदारही नसतील

MahaVikas Aghadi, Minister Jayant Patil, Maharashtra BJP

पुणे, ९ डिसेंबर: राज्यात पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. दुसरीकडे सुशिक्षित मतदारांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट नाकारून महाविकास आघाडीला मतदान केल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी नागपूर आणि पुण्यात देखील भाजपाला सपाटून मार खावा लागला होता.

दरम्यान, पुढील काळात जर विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Irrigation Minister Jayant Patil) यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची (On the occasion on Sharad Pawar’s Birthday) माहिती दिली. पाटील म्हणाले, भाजपाला अलीकडेच हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता भाजपकडून मिशन मुंबईचा नारा दिला गेला आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते. काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील, असेही पुढे ते म्हणाले.

 

News English Summary: If Shiv Sena, NCP and Congress fight together in the forthcoming assembly elections, then even 50 BJP MLAs will not be elected, said NCP leader and Water Resources Minister Jayant Patil.

News English Title: If next assembly election MahaVikas Aghadi will contest in alliance then BJP will have less than 50 MLAs said Minister Jayant Patil news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x