15 December 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

शेतकऱ्यांचा थेट मुकेश अंबानींशी पंगा | Jio ते पेट्रोल, सर्वच वस्तूंवर बहिष्काराचा इशारा

Farmers, Boycott Mukesh Ambani, Reliance, Reliance Jio

नवी दिल्ली, ९ डिसेंबर: “मोदी सरकारने ३ कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. परंतु, आता आम्ही Jio SIM पासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार (Farmers decided to boycott all Reliance items from Jio SIM to Reliance Petrol) आहोत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही”, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोदी सरकारने कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना आज प्रस्ताव पाठवला होता. परंतु, शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. याबाबत आंदोलक शेतकऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी आता शेतकरी आंदोलनाला आणखी आक्रमक रुप येणार असल्याचा इशारा दिला. दिल्लीला लागणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांना सील करु, असा देखील थेट इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी अंबानी-अडाणी यांच्या पेट्रोलपंपांवर पेट्रोल खरेदी करणार नाही, अशी भूमिका मांडली.

“मोठमोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही या कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे”, असं आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितलं

दरम्यान, केंद्राने दिलेला प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा देखील शेतकऱ्यांनी स्पष्ट केली. यात अनेक मुद्द्यांवरुन सरकारची कोंडी करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात टोलप्लाझा बंद पाडण्यात येणार आहेत. तसेच दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा हायवे जाम करण्यात येणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

 

News English Summary: “The Modi government has implemented 3 agricultural laws for corporates. The government has enacted the law to benefit big industrialists. But, now we are going to boycott all Reliance items from Jio SIM. We will also boycott the petrol pumps of industrialists Mukesh Ambani and Gautam Adani. The agitating farmers have warned that they will not take petrol from their petrol pumps.

News English Title: Farmers has decided to boycott Mukesh Ambani’s Reliance goods including petrol News updates.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x