11 December 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

My EPF Money Interest Rate | करोडो नोकरदारांना आर्थिक धक्का देण्याच्या तयारीत मोदी सरकार, EPF व्याजदर कमी करणार?

My EPF Money Interest Rate

My EPF Money Interest Rate | लाखो नोकरदारांना लवकरच धक्का बसू शकतो. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कपात करावी लागू शकते. वृत्तानुसार, सरकार आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफ डिपॉझिटवरील व्याजदर कमी करून तो 8 टक्क्यांच्या आसपास ठेवू शकते. केंद्र सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.1 टक्के व्याजदर मंजूर केला होता.

ईटीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार 2022-23 या आर्थिक वर्षासाठी पीएफ ठेवीवरील व्याजदर सुमारे 8 टक्के ठेवण्याची शक्यता आहे, जी मागील आर्थिक वर्षाइतकीच आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) उत्पन्नावर काम केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. ईपीएफ संदर्भात ईपीएफओच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक येत्या २५ ते २६ मार्च रोजी होत आहे. चालू आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर कमी करण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे.

मोदींच्या सत्ताकाळात व्याजदर चार दशकांतील नीचांकी पातळीवर
आर्थिक वर्ष 2021-22 साठी सरकारने ईपीएफ ठेवींवर 4 दशकातील सर्वात कमी 8.1 टक्के व्याज दर मंजूर केला होता. ईपीएफवरील ८.१ टक्के व्याजदर हा १९७७-७८ नंतरसर्वात कमी होता. केंद्रीय विश्वस्त मंडळाने मार्च 2021 मध्ये आर्थिक वर्ष 2020-21 साठी ईपीएफ ठेवींवर 8.5 टक्के व्याज दर निश्चित केला होता.

कोट्यावधी नोकरदार वर्गावर परिणाम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफ व्याजदर ८ टक्क्यांपर्यत घटवले जाऊ शकतात. पुढील वर्षी लोकसभा निवडणूका होत आहेत. त्याआधी अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे पीएफ व्याजदर मोठ्या फरकाने कमी केले जाणार नाहीत. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात घट होऊ शकते. असे झाल्यास खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यावधी लोकांना त्याचे नुकसान सहन करावे लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: My EPF Money Interest Rate may reduce check details on 06 March 2023.

हॅशटॅग्स

#My EPF Money Interest Rate(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x