26 September 2020 7:15 PM
अँप डाउनलोड

'प्रिय अमित शाह', काश्मीर समस्या सोडवली तशी साकीनाक्याची ट्रॅफिक समस्याही सोडवा

Article 370, jammu Kashmir, Home Minister Amit Shah, Mumbai Traffic

मुंबई : सध्या जम्मू काश्मीरमधील कलम ३७० नंतर सर्वबाजूनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकार देखील ढासळत्या अर्थव्यवस्थेपेक्षा आणि वाढत्या बेरोजगारीपेक्षा भावनिक मुद्यांकडे दुर्लक्ष करून, नागरिकांना देखील त्यावरच केंद्रित करण्याची रणनीती खेळत आहेत. मुळात शहरात राहणाऱ्या लोकांच्या या विषयाला अनुसरून प्रतिक्रिया समजून घेतल्या तेव्हा तिकडे काय सुरु आहे त्यापेक्षा आम्ही राहतो त्या समस्येवर सरकारने बोलावं अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. त्यात चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील मोठी मंडळी देखील वेग वेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यात प्रसिद्ध लेखिका शोभा डे म्हटल्यावर त्या नेहमीच सरकारमधील लोकांना खोचक टोले लगावत असतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यामुळे काळाचा घटनाक्रम जरी जम्मू काश्मीरमधील असला तरी मुंबई शहरातील रोजच्या प्रवासाला आणि ट्रॅफिकला कंटाळलेल्या शोभा डे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खोचक टोला लगावला आहे. देशभरात केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची चर्चा सुरु असताना, वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या शोभा डे यांनी काश्मीरच्याच पार्श्वभूमीवर पण एक वेगळंच विधान करत मुंबईतील ट्राफिक समस्येला हात घातला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे, तुम्ही काश्मीर समस्या सोडवलीत आता साकीनाक्याच्या वाहतूक कोंडीची समस्याही सोडवा अशी उपरोधिक मागणी शोभा डे यांनी केलीये.

“प्रिय अमित शाह, तुम्ही काश्मीर समस्या सोडवली आहे…त्यामुळे आता कृपया वेळ काढून साकीनाक्याच्या वाहतूक कोंडीची समस्याही सोडवा. ही समस्याही 1947 पासून अद्याप सुटलेली नाही”, अशा आशयाचं ट्विट शोभा डे यांनी केलं आहे. समस्त मुंबईकडून ही मागणी करत असल्याचं शोभा डे यांनी ट्विटच्या अखेरीस लिहिलंय.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x