23 November 2019 7:39 AM
अँप डाउनलोड

शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे राज्यात वित्तीय तूट वाढली : भाजप आमदार भातखळकर

मुंबई : भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी वित्त आयोगाला दोषी ठरवत, राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमुळेच वित्तीय तूट वाढल्याचा दावा केला आहे. तसेच राज्य सरकारची पाठराखण करताना भाजपच्या काळातच राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा सुद्धा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढत गेली आणि त्यामुळेच आज राज्यावर आर्थिक हलाखिची वेळ ओढवली आह असं ते म्हंणाले. दरम्यान, मागील वर्षी वित्तीय तुटीची स्थिती होती, परंतु आता राज्याच्या महसुलात साधारण झाल्याचं सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलं.

यावर्षीच्या म्हणजे १५ व्या वित्त आयोगाच्या निष्कर्षांवर सुद्धा टीका करताना, वित्तीय आयोगाचे निष्कर्षच चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे मत व्यक्त करत एकप्रकारे वित्त आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि राज्य सरकारची पाठराखण केली आहे.

हॅशटॅग्स

BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या