18 September 2021 10:19 PM
अँप डाउनलोड

मोदीजी लंडनमधील भाषण चांगले 'स्क्रिप्टेड' होत, पण जनतेला भाषणं नको 'राशन' हवंय

नवी दिल्ली : भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदींच्या लंडनमधील वेस्टमिनिस्टर हॉल मधील भाषणाची ट्विटरद्वारे खिल्ली उडवून पंतप्रधानांना घरचा आहेर दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदींना ट्विट करून लंडनमधील वेस्टमिनिस्टर हॉलमध्ये झालेल्या ‘भारत की बात सबके साथ’ भाषणाचा उल्लेख करत खोचक टोला लगावला आहे. शत्रुघ्न सिन्हा ट्विट करत म्हणाले की, ‘मोदीजी जनतेला भाषण नकोय रेशन हवंय’. इतकंच नाही तर शत्रुघ्न सिन्हा असं ही म्हणाले आहेत की लंडन मधील मोदींचं भाषण हे चांगला ‘स्क्रिप्टेड’ होत. स्क्रिप्टेड म्हणजे एखाद्या ठरलेल्या स्टोरी प्रमाणे असं त्याचा तांत्रिक अर्थ होतो.

कालच काही वर्तमानपत्रात आल्याप्रमाणे लंडन मधील भाषणात मोदींना प्रश्न विचारणारा युवक हा भाजपचे झारखंड मधील प्रवक्ते अमरप्रीत सिंग काले यांचा मुलगा असल्याचे उघड झाले होते. कदाचित त्याचाच संदर्भ जोडत शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींना ‘स्क्रिप्टेड’ शब्द प्रयोग करून खोचक टोला लगावला असणार.

काय आहे नेमकं ट्विट,

खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले. ते म्हणाले, माननीय पंतप्रधान महोदय! तुम्ही लंडनमधील वेस्टमिनिस्टरमध्ये चांगले भाषण दिले. जे अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्केस्ट्रेटेड, कोरियॉग्राफ्ड आणि स्क्रिप्टेड होते. पण भारताच्या जनतेला भाषण नकोय, रेशन हवंय, ते देण्यास तुम्ही सक्षम आहात. वेळ संपत आलीय. पण माझ्या सदिच्छा तुमच्याबरोबर आहेत. जय हिंद!

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1650)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x