BLOG - बलात्कार आणि पॉर्न वेबसाईट्स

पालनपूर : देशभरात विकृतीचा कहर होतोय आणि सर्वच वयोगटातील स्त्रीवर्ग आज ‘पॉर्न बघणाऱ्या’ विकृतीच्या विळख्यात आल्या आहेत. आता रोज वारंवार पॉर्न बघून गुजरातमधील पालनपूर येथे मुलाने जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
२०१२ मध्ये निर्भया बलात्कार प्रकरणाने भारतात खळबळ माजली होती. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात त्या विकृत बलात्कार्यांनी पॉर्न पाहून त्याप्रमाणेच सर्व कृती निर्भयावर बलात्कार करताना केली होती हे सर्वश्रुत आहे. परंतु ‘यू-ट्यूब’वर सहज उपलब्ध असणारे पॉर्न व्हिडिओ पाहून देशभरात एक मोठी विकृती जन्माला आली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच आहे. घराबाहेर फोफावत असलेली ती विकृती आता थेट घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा प्रत्येक स्त्रियांनी आणि मुलींनी ध्यानात घेऊन तिच्या विरुद्ध रणशिंग फुंकणे गरजेचे आहे.
गुजरातमधील पालनपूर येथे मोबाईलवर घरात आई व बहिणीसमोरही रोज रात्र-दिवस अश्लील पॉर्न व्हिडिओ पाहण्याचं व्यसन मुलाला लागलं होत. परंतु त्या व्यसनात तो इतका बुडाला की त्याच्यातील ‘मुलगा’ हैवानामध्ये कधी बदलला हे त्याला सुद्धा नाही कळलं आणि त्यांच्या पालकांनासुद्धा.
अखेर पॉर्न पाहून पाहून एका रात्री उशिरा १ वाजत तो पाणी पिण्याच्या बहाण्याने जन्मदात्या आईच्या खोलीत प्रवेश केला. आई झोपल्याचे पाहून त्यानं बळजबरीने आईवरच बलात्कार केला. मुलाच्या विकृत कृतीने त्याच्या आईला प्रचंड धक्का बसला आहे. मुलाने पॉर्न विडिओ पाहून रात्री तिच्याबरोबर बलात्कार केला या धक्याने ती रात्रभर स्तब्ध झाली होती. अखेर सकाळी उठल्यावर तिनं कामानिमित्त बाहेर असलेल्या पतीला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला.
त्यांच्याच अहमदाबाद येथे असलेल्या मोठ्या मुलाला सांगून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचा सल्ला पतीनं दिल्यानंतर आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
परंतु यूट्यूब मार्फत मोबाईलवर सहज उपलब्ध असलेले पॉर्न व्हिडिओ माणसातला हैवान जागा करत असून त्यांच्या विकृतीची शिकार कोण होईल याची शाश्वती भविष्यात देता येणार नाही. आजच्या घडीला तरी समस्त स्त्रियांच्या मनातील या ‘भयानक’ विषयात हाथ घालून थेट ‘यू-ट्यूब’ वरून सर्व पॉर्न कायमचे उडविण्यासाठी आंदोलन उभं करून गुगलवर दबाव आणणारा राजकीय नेता संपूर्ण भारतात नाही.
मुळात घटना घडली आणि ती आम्ही बातम्यां मधून वाचून सोडून दिली अशी भूमिका जर समस्त स्त्रीवर्गाने घेतली तर परिस्थती भविष्यकाळात फारच कठीण होऊन बसेल. अगदी आज ट्युशनला जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आणि इंटरनेट सहज उपलब्ध आहे. सर्वच मुलं तशी असतात असं आम्ही कधीच नाही बोलणार, परंतु अनेक मुलं दुसऱ्यांच्या संगतीने ते करण्याची दाट शक्यता असते. अगदी मोबाईलमधील बघितलेल्या चुकीच्या गोष्टी ‘वॊच हिस्टरी’ मधून उडवून पालकांपासून लपवतात आणि पालकांना त्याची कधी कल्पनाच येत नाही. वयानुसार ती विकृती वाढतच जाते आणि एक दिवस भयानक वास्तव समोर आणते.
चीन सारख्या विकसित देशात, ब्राझील सारख्या विकसनशील देशात आणि अनेक इस्लामिक देशांमध्ये या पॉर्न व्हिडिओ मुळेच संपूर्ण यू-ट्यूब वर बंदी आहे. त्यामुळे यू-ट्यूबच अर्थकारण बऱ्यापैकी अमेरिका आणि भारतावर अवलंबून आहे. भारतात तर एखाद्या गृह उद्योगाप्रमाणे अनेक गट आहेत जे यू-ट्यूब वर प्रायव्हेट चॅनेल्स बनवतात. त्यानंतर बंद दरवाज्याआड अश्लील फिल्म बनवल्या जातात आणि ते स्वतःच्या प्रायव्हेट चॅनेल्स अपलोड करून ते यू-ट्यूबवर सहज सर्च करता येतील अशा नावाने लिस्ट केले जातात. मग त्याच्यावर लाखो करोडो हिट्स आल्या की, त्यामार्फत यूट्यूब थिर्ड पार्टी जाहिराती दाखवतं आणि त्यातील काही नफा त्या प्रायव्हेट चॅनेल्सच्या मालकाशी शेअर करत हे त्यामागच व्यावसायिक कारण, जे बऱ्याच जणांना ठाऊक सुद्धा नाही.
विरोध हा ‘यूट्यूब’ला नसून त्यावरील पॉर्न व्हिडिओला झाला पाहिजे. मुलांसाठीची शैक्षणिक लर्निंग गेम्स, विविध भाषेतील गाणी-सिनेमे-सिरियल्स, जेवणाच्या रेसिपीज आणि अनेक चांगल्या गोष्टी, ज्यामुळे समाजावर विपरीत परिणाम होत नाही अशा गोष्टी राहिलास काहीच हरकत नाही. परंतु पॉर्न व्हिडिओ ना अपलोड करण्यास परवानगीच नसावी आणि असलेले लाखो करोडो पॉर्न व्हिडिओ कायमचे यूट्यूबवरून उडवुन टाकण्यास यूट्यूबवर राजकीय दबाव आणण्यास भाग पाडणे अशक्य नाही. गुगलकडे म्हणजे यूट्यूबकडे स्वतःचे असे ऑटो प्रोग्रॅम्स आहेत जे व्हिडिओ आणि त्या व्हिडिओचा प्रकार ओळखतात आणि सर्च प्रमाणे बरोबर तुमच्याकडे सर्व लिस्ट दाखवली जाते. जर ठरवलं तर एका तासातच गुगल सर्व पॉर्न यूट्यूब वरून कायमचे उडवून टाकू शकते आणि पुन्हा ते अपलोड सुद्धा करता येणार माहित याची तरतूद करून ठेऊ शकतात.
पण विषय येतो तो राजकीय इच्छा शक्तीचा. स्त्रियांच्या – लहान मुलीच्या – तरुण तरुणींच्या भविष्य काळासाठी गांभीर्याने विचार करणारे किंव्हा विचार करणारा राजकारणी नेता या देशात आहे का याचा ? कारण भारतातून त्याला विरोधच होत नसेल आणि त्यामागचं गांभीर्यच कळत नसेल तर ‘यूट्यूब’ तरी कशाला आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून सर्व लिस्टेड पॉर्न भारतातून कायमचे हद्दपार करेल. कारण त्यांना पैसा महत्वाचा आणि आपल्या राजकारण्यांना ‘निवडणुका आणि मत’.
त्याच जिवंत उदाहरण म्हणजे, गुजरात विधानसभा निवडणुकी दरम्यान आलेला अनुभव, केवळ निवडणूक जिंकण्यासाठी अश्लील चाळ्यांचे (पॉर्न नाही) व्हिडिओ रेकॉर्ड करून ते देशभर विविध माध्यमातून प्रत्येक घराघरात केंद्रातील आणि गुजरातमधील राज्यकर्त्यांनीच पोहोचवले होते हे वास्तव आहे. तेच वैयक्तिक आयुष्यातले ‘हार्दिक’ व्हिडिओ करोडो लोकांनी पहिले होते. कोणाला माहित आहे का ते करोडो पाहणारे लोक कोण कोणत्या वयातील होते ?
अमेरिकेत यूट्युबदेखील अडचणीत आले आहे. अमेरिका स्थित तब्बल २३ संस्थांनी यूट्युबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार दाखल केली असल्याने अमेरिकेत खळबळ माजली आहे. यूट्युबवर व्हिडीओ पाहणाऱ्या १३ वर्षाखालील लहान मुलांची माहिती ‘यूट्युबवर’ म्हणजे गुगलकडून गोळा केली जाते. या माहितीत फोन क्रंमांक, मुलांचे लोकेशन आणि डिव्हाईसची माहिती गुगलकडून गोळा केली जात असून त्यांचा आधार घेऊन त्यांना इतर संकेतस्थळांवर ट्रॅक केले जाते तसेच अशा प्रकारची माहिती गोळा करताना मुलांच्या वयानुसार पालकांकडून परवानगीदेखील घेतली जात नाही असं या संस्थांचं म्हणणं आहे.
त्यामुळे गुगल कंपनीकडून अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंघन होत असल्याचे तक्रारदार संस्थांचे म्हणणे आहे. या २३ संस्थांमध्ये अमेरिकेतील कॅम्पेन फॉर कमर्शियल-फ्री चाईल्डहूड आणि सेंटर फॉर डिजिटल डेमोक्रसी अशा महत्वाच्या संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे गुगल कंपनीकडून अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंघन होत असल्याने अमेरिकेत यूट्युबविरोधातील तक्रारीची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
परमेश्वर करो आणि कोणाची तरी ‘ट्यूब’ पेटो आणि देशातील ९० टक्के बलात्कारांचं मूळ असलेले ‘यूट्यूब वरील पॉर्न’ लवकरात लवकर कोणाच्या तरी क्रातींकारी पुढाकाराने कायमची हद्दपार होऊ देत हीच अपेक्षा. नाहीतर १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशवासीयांची प्रभोधनातून मानसीकता बदलता येऊ शकते हे तत्वज्ञान्यांचे सल्ले आयुष्यभर टेलिव्हिजन वाहिन्यांवर ऐकत बसण्या व्यतिरिक्त दुसरा काहीच पर्याय नसेल हे ‘कटू’ सत्य आहे.
कडक कायदा आणि यूट्यूब वरील पॉर्न कायमचे हद्दपार, अश्लील व्हिडिओ – इमेजेस साईट्स हद्दपार आणि घरातील संस्कार हाच बलात्कार रोखण्यासाठी उत्तम उपाय आहे. पण त्या दिशेने सुरुवात होणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Gold and Silver Price | सोन्या-चांदीची चमक वाढली | पाहा आजचा मुंबई आणि इतर शहरातील दर
-
Spam Calls Rules | आता तुमची स्पॅम कॉल आणि अज्ञात कॉल्सपासून सुटका होणार | जाणून घ्या सरकारची योजना
-
Prudent Corporate Advisory IPO | प्रूडेंट कॉर्पोरेट अॅडव्हायजरी शेअरची लिस्टिंग प्रथम जोमात नंतर कोमात
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Paytm Share Price | पेटीएमचा तोटा 762 कोटीवर पोहोचला | शेअर्सची किंमत अजून कोसळणार?
-
Aadhaar Card Photo | आधार कार्डचा फोटो बदलायचा की अपडेट करायचा आहे? | जाणून घ्या प्रक्रिया
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा