13 November 2019 11:55 PM
अँप डाउनलोड

पुढची ५० वर्ष सत्तेत राहण्याची स्वप्नं पाहा: अमित शाह

गाझियाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुढची ५० वर्ष सत्तेत राहण्याची स्वप्नं पाहा असा आवाहन आणि कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला आहे.

रविवारी गाझियाबाद येथील सभेत संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिला. कार्यकर्त्यांनी पुढील 50 वर्षांत सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहावी, असं आवाहन त्यांनी उपस्थिती कार्यकर्त्यांना केलं.

देशात होणाऱ्या निवडणुकीतील विजयाची कल्पना केवळ ५ वर्ष, १० वर्ष आणि १५ वर्ष अशी मर्यादित ठेऊ नका, तर भाजपला पुढची ५० वर्ष सत्ता करायची आहे असा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. काँग्रेसने जसं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रदीर्घकाळ ग्रामपंचायत पासून ते संसदेचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन देशावर राज्य केलं. त्याप्रमाणेच पुढची ५० वर्ष सत्तेत राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे असं अमित शाह म्हणाले.

कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकीपर्यंतचा विचार करून काही होणार नाही तर पक्षाने विकासकामांत अखेरपर्यंत जीव ओतून काम करायला हवं. कार्यकर्त्यांना अपमान सहन करावा लागेल असं एकही काम चार वर्षात मोदीसरकारने केलं नाही. त्यामुळेच कार्यकर्ते ताठ मानेने चालतात असं अमित शहा म्हणाले.

हॅशटॅग्स

#Amit Shah(174)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या