8 December 2021 6:47 PM
अँप डाउनलोड

चंद्रकांत पाटलांनी विधानसभेला उभं राहावं, पवारांचं थेट आवाहन

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवावी असं थेट आवाहन दिलं आहे.

देशाची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत असून शेतकऱ्यांपासून ते समाजातील सर्वच थरातील लोक अडचणीत आहेत. राज्याचे सर्व धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात. परंतु आता तसे निर्णय थेट कोल्हापूर या उपकेंद्रातून घेतले जात आहेत असा टोला शरद पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

शरद पवार हे कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आयुष्यात कधी संधी मिळाली नाही तरी सकाळ, दुपार – संध्याकाळ संधी घेतली जाते. त्याप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना थेट विधानसभा निवडणूक लढवावी म्हणजे त्यांना सर्व काही कळेल असं आवाहन पवारांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना दिलं.

शरद पवारांच्या या टीकेचा धागा होता तो म्हणजे महसूलमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधर मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळेच शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना थेट विधानसभा लढविण्याच आवाहन दिल.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(423)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x