8 July 2020 12:22 AM
अँप डाउनलोड

फरार आरोपींचे भाजपवर एकामागे एक आरोप, अर्थमंत्री अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय: ललित मोदी

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारतीय बँकांचे ९००० कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर पलायन केलेल्या आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, अशी धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. परंतु, त्यानंतर आता अजून एक भारताबाहेर पलायन केलेला आरोपी ललित मोदीने अर्थमंत्री अरुण जेटलींची तुलना सापाशी करत, त्यांना खोटं बोलण्याची सवय असल्याचा दावा करत विजय मल्ल्याची भेट झाल्याचं खरं असल्याचं म्हटलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांच्यावर आयपीएल लिलावात लाच घेण्याचा, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. सन २०१० पासून ते भारतातून फरार झाले असून लंडन’मध्ये वास्तव्यास असल्याचं म्हटलं जात. ललित मोदीने ट्विट करून म्हटलं आहे की, ‘तिथे असलेल्या लोकांना माहित आहे की, अरुण जेटलींनी विजय मल्ल्याची भेट घेतली होती. तरी ते वृत्त जेटली का फेटाळत आहेत? अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय आहे. तुम्ही एका सापाकडून (सर्पाचं चिन्ह) आणखी कोणती अपेक्षा ठेऊ शकता’? असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्या ट्विट मध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल्या या दोघांना टॅग करण्यात आलं आहे.

त्यामुळे घोटाळे करून फरार झालेले सर्व आरोपी एकामागोमाग भाजपचे बिंग फोडू लागल्याने एकूणच आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजप तसेच मोदी सरकारच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Arun Jaitley(19)BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x