7 December 2021 6:02 AM
अँप डाउनलोड

पेट्रोल डिझेलचे दर आणि त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून वाढणारे इंधनाचे दर आणि त्यामुळे वाढत जाणारी महागाई कमी होण्याची शक्यता नसून ती अधिकच वाढण्याची लक्षण दिसू लागली आहेत. कारण मागील महिन्यापासून जागतिक पातळीवर क्रुड ऑईलचे उत्पादन प्रति दिन १० कोटी बॅरेल इतके विक्रमी झाले होते. मात्र, येणाऱ्या काही दिवसांत जागतिक घडामोडींमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, त्यामुळे इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने सूचित केल्याप्रमाणे इराण तसेच व्हेनेझुएला या देशातून इंधनाच्या निर्यातीत घट होणार आहे. त्यात व्हेनेझुएलामधील राजकीय अस्थिरतेचा परिणाम कच्च्या तेलाच्या उत्पादनावर होत असल्याचे समोर येत आहे. त्यात दुसरी भर म्हणजे, अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधाचा परिणाम इंधनाच्या उत्पादनावर आणि दरावर होत आहे असं आयइए’ने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान व्हेनेझुएलामधील राजकीय अस्थिरतेमुळे परिस्थिती अजूनच खराब होणार असून लिबीयात अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता ‘आयइए’ने व्यक्त केली आहे. भारत तसेच चीन या प्रमुख देशांकडून होणारी इंधन खरेदी कमी झाली असून आगामी काळात अजून काही देश इराणकडून इंधन खरेदीत कपात करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘ओपेक’ सदस्य देशांनी क्रुड ऑईलचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला असाल तरी व्हेनेझुएलामधील परिस्थितीने ‘ओपेक’च्या निर्णयाने काही जास्त फरक पडणार नाही असं तज्ज्ञांना वाटत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1657)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x