14 November 2019 1:16 PM
अँप डाउनलोड

ते महागठबंधन नाही 'महाठगबंधन' आहे, तर शरद पवार हे शकुनी मामा: पूनम महाजन

मुंबई : नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत आणि विरोधकांकडे तर पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही. विरोधकांनो तुमचा पंतप्रधान कोण, असे विचारल्यानंतर सोमवारपासून शनिवापर्यंत मायावती, अखिलेश, स्टॅलिन, चंद्राबाबू, ममता हे नेते एक एक दिवस पंतप्रधान होतील आणि रविवारी सुट्टीच्या दिवसाचे पंतप्रधान शरद पवार असतील, अशी खासदार पूनम महाजन यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

दरम्यान, त्याच वेळी पूनम महाजन यांनी विरोधकांच्या महागठबंधनला ‘महाठगबंधन’ असे संबोधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा थेट शकुनी मामा असा उल्लेख केला. प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या युवा महासंगम जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चोर, कोल्हे, जनावरे, पाकधार्जिणे, अशा शेलक्या शब्दांत टीकेची जोड उठविली. दरम्यान, या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार अशीष शेलार, भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन, प्रदेश भाजयुमो अध्यक्ष योगेश टिळेकर उपस्थित होते.

दरम्यान, पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, सारे चोर एकत्र आले, जनावरांनी एकत्र येऊन कळप केला तरी, वाघाला पराभूत करू शकत नाहीत आणि मोदी वाघ आहेत, असा विरोधकांवर हल्लाबोल त्यांनी केला. या देशात फक्त नरेंद्र मोदी हे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू, स्टॅलिन, हे आपापल्या प्रदेशाचे नेते आहेत.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(198)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या