25 April 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

कोरोना आपत्ती: मुंबईतील जीएसबी मंडळाकडून यंदाचा गणेशोत्सव रद्द

GSB Sarvajanik Ganeshotsav Samiti Wadala, Ganesh Chaturthi Celebrations

मुंबई, २६ मे: महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. त्यातच बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. मात्र गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गणेशभक्त येत असतात. कोरोनाच्या परिस्थितीत या गर्दीवर नियंत्रण कसे मिळवायचे आणि सोशल डिस्टन्सिंग कसे राखायचे, असा पेच सर्व गणेशोत्सव मंडळांमध्ये निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी वडाळा राम मंदिर जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक महत्त्वपूर्व निर्णय घेतला आहे. या वर्षी भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गणेशोत्सव साजरा न करता, पुढील वर्षी २०२१ साली माघ महिन्यातील गणेश चतुर्थीला साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जीएसबी सार्वजनिक गणेश उत्सव समिती ट्रस्टचे सचिव मुकुंद कामात म्हणाले की, देशात सुरू असलेल्या करोनाच्या विळख्यापासून लवकर सुटका होईल असं वाटत नाही. गणेशत्सवात दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात. गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टसिंगचे नियम राखण्यासाठी, तेसच भाविकांच्या आरोग्याचा सुरक्षिततेसाठी माघ महिन्यात गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

 

News English Summary: The corona crisis in Maharashtra is becoming more and more worrisome. There is a longing for the arrival of Bappa. But in Ganeshotsav, millions of Ganesha devotees come to see Bappa. The dilemma of how to control the crowds and maintain social distance in the corona situation has been created in all Ganeshotsav circles.

News English Title: GSB Sarvajanik Ganeshotsav Samiti Wadala Has Postponed Its Ganesh Chaturthi Celebrations News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x