26 April 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

उत्तर प्रदेशात महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू | फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

Mahant Narendra Giri

प्रयागराज, २० सप्टेंबर | प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशात महंत नरेंद्र गिरी संशयास्पद मृत्यू, फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह – Akhil Bharatiya Akhada parishad president Mahant Narendra Giri died body found in suspicious condition :

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची बातमी येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच आयजी केपी सिंह तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनीदेखील नरेंद्र गिरी यांचा मृतदेह ज्या ठिकाणी फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला त्या ठिकाणाची पाहणी केली. पोलिसांकडून मठामधील लोकांची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह एका पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. तसेच ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेला होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते. पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

Mahant Narendra Giri Death :

मृत्यूपत्राप्रमाणे लिहिली आहे सुसाइड नोट
आयजी केपी सिंह यांनी सांगितले की त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यात शिष्य आनंद गिरी यांचाही उल्लेख आहे. नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये कोणत्या शिष्याला काय द्यायचे आहे? किती द्यायचे, या सर्वांचाही उल्लेख केला आहे. सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले आहे की ते त्यांच्या काही शिष्यांच्या वागण्याने खूप दुखावले आहेत आणि म्हणूनच ते आत्महत्या करत आहे.

कालच उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी घेतला होता आशीर्वाद
एक दिवस आधी रविवारी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजमध्ये होते. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन महंत नरेंद्र गिरी यांचे आशीर्वाद घेतले. अलीकडेच, प्रयागराज येथे आलेले डीजीपी मुकुल गोयल देखील हनुमान जी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते.

महंत नरेंद्र गिरी गेल्या दोन दशकांपासून साधु-संतांमध्ये महत्त्वाच्या स्थानावर होते. प्रयागराज येथे आगमन झाल्यावर, मोठे नेते असोत किंवा उच्च पोलिस-प्रशासकीय अधिकारी असो, ते महंतांकडून आशीर्वाद घेण्यासाठी लेटे हनुमान जीच्या दर्शनासाठी अवश्य जात होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही बांघबरी मठात जात असत.

काही काळापासून शिष्यासोबक महेंद्र यांचा सुरु होता वाद
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी आणि त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यात बराच काळापासून वाद होता, पण नंतर त्यांनी एक करार केला होता. त्यानंतर हरिद्वारहून प्रयागराजला पोहोचलेल्या आनंद गिरी यांनी त्यांचे गुरु स्वामी नरेंद्र गिरी यांच्या पाया पडून माफी मागितली.

आनंद म्हणाले होते – मी माझ्या कृत्याबद्दल पंच परमेश्वराचीही माफी मागतो आहे. मी सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्सवर माझ्याकडून जी काही विधाने जारी केली आहेत ती मी परत घेतो. यानंतर महंत नरेंद्र गिरी यांनीही आनंद गिरी यांच्यावरील आरोप मागे घेऊन त्यांना माफ केले.

यानंतर आखाडा परिषदेने केला होता हस्तक्षेप
अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या हस्तक्षेपानंतर हा वाद तूर्तास शांत करण्यात आला होता. यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आनंद गिरी आखाड्यात आपल्या गुरूची पूजा करू शकले होते. आखाडा आणि मठात आनंदा गिरीच्या प्रवेशावर लावलेली बंदी काढून टाकण्यात आली. मात्र, आनंद गिरी यांची आखाड्यातून हकालपट्टी मागे घेण्यात आली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Akhil Bharatiya Akhada parishad president Mahant Narendra Giri died body found in suspicious condition.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x