13 December 2024 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

कोरोना लस येण्यास उशीर होणार, लॉकडाउन उठवताना सर्व देशांनी सावध राहावं - ज्येष्ठ अमेरिकन शास्त्रज्ञ

Top American HIV Scientist, Warns Corona virus Vaccine

वॉशिंग्टन, २२ मे: कोरोनावर लवकर लस मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे. नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही, असा इशारा कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने दिला आहे.

विलियम हेसलटाइन, असं या शास्त्रज्ञांचं नाव आहे. विलियम हे कर्करोग, एचआयव्ही/एड्स आणि मानवी जीनोम प्रकल्पांसंदर्भात काम करतात. ‘रॉयटर्स’शी बोलताना विलियम म्हणाले,”करोनाचा मुकाबला करण्यासाठी नजिकच्या काळात लस तयार होण शक्य नाही. त्यामुळे लॉकडाउन उठवताना किंवा शिथिल करताना सर्वच देशांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि स्वयं क्वारंटाइन या पद्धतीचा उपयोग करायला हवा,” असा सल्ला त्यांनी दिला.

“निवडणूक येईपर्यंत आपल्याकडे लस तयार होईल, असं सांगणाऱ्या राजकीय नेत्यांचं ऐकू नका. कदाचित आपल्याला ती लस मिळेलही, पण हा काही जिंकण्याचा प्रकार नाही… कारण आतापर्यंत आपण सार्स आणि मेर्सवर लस शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर पूर्णपणे सुरक्षाउपाय मिळू शकला नाही,” असं ते म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेतील मोडर्ना कंपनीने कोरोनापासून मुक्ती बनविण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत कोरोना व्हायरसविरोधात लस विकसित केल्यामुळे जगभरात एक आशा निर्माण झाली होती. तत्पूर्वी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली “ChAdOx1 nCoV-19” लस माकडांवर निष्प्रभ ठरली आहे. या लसीला माकडांमध्ये इन्फेक्शन रोखता आलेले नाही. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूट ही लस विकसित करत आहे. करोना व्हायरस विरोधात लस विकसित करण्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे.

ज्या माकडांना –ChAdOx1 nCoV-19 ही लस देण्यात आली होती. त्यांचा जेव्हा Covid-19 ला कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरस बरोबर सामना झाला, तेव्हा शरीरात इन्फेक्शन पसरले असे डॉ. विलियम हासीलटाइन यांच्या हवाल्याने डेली एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे. हे यूकेमधील वर्तमानपत्र आहे. “लस टोचण्यात आलेल्या आणि ज्यांना लस दिली नाही अशा माकडांमधील व्हायरल आरएनएच्या प्रमाणात फार फरक नव्हता. याचा अर्थ लस दिली त्यांनाही इन्फेक्शनची बाधा झाली” असे डॉ. विलियम म्हणाले.

 

News English Summary: The chances of getting an early vaccine on corona are dwindling. There is no guarantee that the corona vaccine will be available in the near future, warns American scientists researching cancer and HIV.

News English Title: Top American HIV Scientist Warns Corona virus Vaccine Not Guaranteed News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x