नवी दिल्ली, ०३ जुलै | फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.

फ्रेंच एनजीओ शेरपाने केली होती तक्रार:
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी फ्रेंच एनजीओ शेरपाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मीडियापार्ट संबंधित प्रकरणावर सलग अहवाल प्रसिद्ध केला होता. परंतु, पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेजने चौकशीच्या मागणीला फेटाळून लावले होते.

दरम्यान, फ्रान्स सरकारने भारताशी झालेल्या जवळपास 59,000 कोटी रुपयांच्या राफेल युद्ध विमान खरेदी करारामधील कथित “भ्रष्टाचारा”ची न्यायालयीन चौकशी सुरू केलीय. यानंतर काँग्रेसने मोदी सरकारला घेरलंय. फ्रान्सनेही राफेल व्यवहाराची चौकशी सुरू केलीय, आता तरी मोदी सरकार भारतात संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) चौकशीला परवानगी देणार का? असा सवाल काँग्रेसने विचारलाय. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विट करत यावर भूमिका स्पष्ट केलीय.

रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले, फ्रान्सच्या सरकारला प्राथमिक स्तरावर राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचं दिसलंय. काँग्रेस आणि राहुल गांधी आधीपासून जे सांगत होते ते यामुळे आज सिद्ध झालंय. 14 जून 2021 रोजी फान्सचे पब्लिक प्रॉसिक्युशनने राफेल व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी करुन भ्रष्टाचार क्रोनी कॅपिटॅलिझम, चुकीच्या पद्धतीने व्यवहारावर प्रभाव टाकणे आणि राफेल निर्मितीच्या कामासाठी चुकीच्या पद्धतीने लोकांना उमेदवार बनवणे याची चौकशी सुरू केलीय.”

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress party demand JPC inquiry of Rafale deal corruption after France order to investigate news updates.

फ्रान्स सरकारनेही राफेलची चौकशी सुरू केलीय | आता मोदी सरकार करणार का? – काँग्रेस