12 December 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या
x

Post Office Scheme | होय! या पोस्ट ऑफिस योजनेत मिळतील डबल फायदे, फक्त 200 रुपये जमा करून लाखो परतावा, स्कीम नोट करा

Post Office Scheme

Post Office Scheme | पूर्वीचा एक काळ होता, जेव्हा लोकांना गुंतवणुकीचे खूप मर्यादित पर्याय उपलब्ध होते. लोकांना स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावण्यास जोखीम वाटते, म्हणून लोक पोस्ट ऑफिससारख्या गुंतवणूक पर्यायामध्ये पैसे लावतात. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा असा की, यात केलेली गुंतवणुक सुरक्षित मानली जाते आणि यावर भारत सरकार स्वतः सुरक्षेची हमी देते. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात चांगला परतावा मिळतो मात्र त्यात असलेली जोखीम नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांना जोखीम न घेता पैसे कमवायचे असतात. तुम्हाला ही बिना जोखीम गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर पोस्ट ऑफीसतर्फे अनेक योजना राबवल्या जातात ज्यात तुम्ही गुंतवणूक करून आपले पैसे वाढवू शकता. पोस्ट ऑफीस योजनेत गुंतवलेले पैसे 100 टक्के सुरक्षित राहतील याची हमी भारत सरकार देते. कोणतीही जोखीम आणि धोका न देता पोस्ट ऑफीस योजना तुमचे पैसे अनेक पट वाढवू शकते.

रिकरिंग डिपॉझिट स्कीम :
पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये तुम्हाला मोठी रक्कम जमा करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफीसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. या योजनेत तुम्ही किमान 100 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत गुंतवणूकीची कलम मर्यादा उपलब्ध नाही, तुम्ही हवी तेवढी रक्कम जमा करू शकता. योजनेचा कालावधी तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक वर्ष, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी निश्चित करु शकता. पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला दर तीन महिन्यांनी चांगला व्याजही कमावून देते.

कर्ज घेण्याची सुविधा :
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीम योजनेत 18 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाची व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपले खाते उघडू शकतो. आई किंवा वडील अल्पवयीन मुलाच्या नावाने ही खाते उघडू शकतात आणि त्यात गुंतवणूक करू शकतात. अडचणीच्या काळात तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीममधूनही कर्ज देखील घेऊ शकता. या योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला नजीकच्या पोस्ट ऑफिस शाखेशी संपर्क साधावा लागेल. हे कर्ज तुम्ही 12 हप्त्यांमध्ये परतफेड करू शकता. तुमच्या खात्यात जमा असलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम तुम्ही कर्ज म्हणून घेऊ शकता.

रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये मिळणारा परतावा :
पोस्ट ऑफीसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये दरमहा 6,000 रुपये म्हणजेच दररोज 200 रुपये गुंतवणूक केल्यास 90 महिन्यांनंतर म्हणजेच 7.5 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 6 लाख 76 हजार रुपये परतावा मिळेल. समजा तुम्ही दरमहा 6,000 रुपये जमा केले, तर एका वर्षात तुमची 72,000 रुपये ही तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक जमा होईल. अशाप्रकारे जर तुम्ही पुढील 7.5 वर्ष सतत गुंतवणूक करत राहिलात तर तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 5 लाख 40 हजार रुपये जमा होईल. यानंतर योजनेच्या मॅच्युरिटीवर 1,36,995 रुपये तुम्हाला व्याज परतावा म्हणून दिला जाईल. अशाप्रकारे अल्पबचत केल्यास तुम्हाला 90 महिन्यात 6,76,995 लाख रुपये रक्कम मिळेल. आवर्ती ठेव योजनेत गुंतवणुक केल्यास तुमची नियमित बचत ही होईल आणि त्यावर तुम्हाला जबरदस्त व्याज देखील मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Recurring deposit scheme for Investment to earn huge interest on investment on 02 December 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x