21 March 2023 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
x

ब्रिटनचे पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांना देखील कोरोनाची लागण

UK Health Minister Matt Hancock, Covid 19, Corona Crisis

लंडन, २७ मार्च : कोरोनाने ब्रिटनमध्येही थैमान घातलं आहे. बाधितांची संख्या वाढत असतानाच आज ब्रिटनला मोठा धक्का बसला. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोरोना असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना तातडीने आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात जे लोक आलेत त्यांनाही क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

तत्पूर्वी प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोना झाल्याचं निदान झालं होतं. ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत ११ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ५७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनंतर आता आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी स्वत: ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.

शुक्रवारी ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी एक व्हिडिओ ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, ‘मला कोरोना विषाणूची तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तपासणी केल्यानंतर मला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने माझ्यात सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. मी आता घरून काम करत आहे आणि स्वत:ला विलग केले आहे.’

 

News English Summary: UK Health Minister Matt Hancock is now infected with the corona virus after the British Prime Minister. Health Minister Matt Hancock tweeted himself and reported that Corona was infected. “I am going to work from home and I have separated myself,” he said. In the same day, the Prime Minister and the Minister of Health suffered a single outbreak in Britain due to Corona infection. In the past, Prince Charles of Britain has been infected with the corona virus.

 

News English Title: Story United Kingdom Health Minister Matt Hancock tests positive for Covid 19 Corona Crisis England News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x