9 May 2021 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
थोडी जरी लाज शिल्लक असेल तर देशाची जाहीर माफी मागा | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पी. चिदंबरम इतिहास घुसमटला | दिल्ली इंडिया गेटच्या श्वास आणि देशवासीयांचा श्वास एकाच वेळी घूसमटत आहे कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा केंद्र सरकारचा ढिम्म कारभार | अखेर सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
x

कॅपिटॉल हिंसाचार | लेहाय विद्यापीठाने ट्रम्प यांची मानद पदवी रद्द केली

Lehigh University, US President Donald Trump, honorary degree

वॉशिंग्टन, ९ जानेवारी: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले आहे. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

बुधवारी झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं अकाउंट 12 तासांसाठी ब्लॉक केलं होतं. त्याशिवाय त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक ट्विट्सही हटवण्यात आले होते. परंतु आता ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पूर्णपणे सस्पेंड केलं आहे. अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांचं अकाउंट सस्पेंड केल्याचं कारण ट्विटरने दिलं आहे.

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना अजून एक झटका देण्यात आला आहे. लेहाय विद्यापीठाने ट्रम्प यांना १९८८ मध्ये बहाल केलेली पदवी रद्द केली आहे. त्यामुळे ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याच्या प्रकरणानंतर ट्रम्प यांना अजून झटके बसत आहेत.

 

News English Summary: Lehigh University has revoked US President Donald Trump’s honorary degree which was awarded to him in 1988. After the Capitol chaos on Jan 6, the university has concluded that what Trump’s supporters did has violated US’ democracy and decided to revoke Trump’s honorary degree.

News English Title: Lehigh University has revoked US President Donald Trump honorary degree awarded in 1988 news updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x