27 April 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत
x

उच्च शिक्षित भारतीयांचं अमेरिकेत नोकरीच स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प घेणार मोठा निर्णय

US President Donald Trump, Unemployment, H1B Visa, Corona Crisis

वॉशिंग्टन, १२ जून: भारतात आयआयटी करून बहुतांश विद्यार्थी अमेरिकेला जातात. उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत जाण्याचं स्वप्न अनेक भारतीय तरुण, तरुणी पाहतात. मात्र आता हे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एच-१बी (H1-B) व्हिसासह सर्व प्रकारचे एम्पॉयमेंट व्हिसा रद्द करण्याच्या विचारात आहे. वॉल स्ट्रिट जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अमेरिकेत लॉकडाउन करण्यात आल्याने तिथे मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अमेरिकेतील स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प H-1B सह काही व्हिसा स्थगित करण्याचा विचार करत आहेत. एक ऑक्टोंबरपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात ट्रम्प प्रशासनाकडून ही स्थगिती लागू केली जाऊ शकते. कारण याच काळात नवीन व्हिसा जारी केले जातात.

H-1B व्हिसावर अमेरिकन कंपन्यांना विविध परदेशी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवता येते. अमेरिकन टेक्नोलॉजी कंपन्या दरवर्षी H-1B व्हिसाच्या आधारे हजारो भारतीय आणि चिनी तरुणांना नोकऱ्या देतात. ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतल्यास आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो भारतीयांना याचा फटका बसू शकतो. H-1B व्हिसावर अमेरिकेत असलेल्या अनेक भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असून ते मायदेशी परतले आहेत.

इंफोसिस, विप्रोसारख्या भारतीय कंपन्या एच-१ बी व्हिसाच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत साईटवर (ऑन-साईट) पाठवतात. ट्रम्प प्रशासनानं एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास याचा फटका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो व्यक्तींना बसेल. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे आधीच या क्षेत्रातील लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत.

 

News English Summary: Most of the students go to America by doing IIT in India. Many young Indians dream of going to America with higher education. But now this dream is likely to have to wait a long time to come true. US President Donald Trump is considering revoking all employment visas, including H1-B visas.

News English Title: Trump Considering Suspending H1B Other Visas As Us Unemployment Spikes News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x