30 June 2022 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

Fake News | पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी घोषणांचं वृत्त खोटं | ठराविक माध्यमांकडून खोटं वृत्त

Fake News, Fact Check, Modi Modi chants, Pakistan Parliament

नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर: पाकिस्तानच्या संसदेत मोदी मोदीच्या घोषणा देण्यात आल्या असं वृत्त गुरुवारी काही प्रसारमाध्यमांनी चालवलं. यामध्ये TRP scam संबंधित अतिउतावळ्या वाहिन्या साहजिकच आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री फ्रेंच उत्पादनांवर बंदी घालण्यासंदर्भातल बोलत होते तेव्हा बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा दिल्या असंही या वृत्तात सांगण्यात आलं होतं.

वास्तविक हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे आणि असा कोणताही प्रकार पाकिस्तानच्या संसेदत घडलेला नाही. इंडिया टीव्हीने सहित, News Nation, Times Now आणि इतर अनेक वाहिन्यांनी कोणतीही शहानिशा न करता यावर वृत्तांकन तर केलंच आणि स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील त्याला प्रसिद्धी देऊन चर्चा घडवून आणल्याचं पाहायला मिळालं. मात्र ते वृत्त संपूर्णपणे चुकीचं आहे.

नेमकं काय आहे या व्हिडीओमागचं सत्य नेमकं काय घडलं? ते आम्ही आता तुम्हाला या बातमीत खात्री करू शकता.

काय आहे सत्य?

पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदीचे नारे नाही तर व्होटिंग व्होटिंग अशा घोषणा देण्यात येत होत्या. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री हे जेव्हा बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा काही खासदारांनी व्होटिंग व्होटिंगच्या घोषणा दिल्या होत्या. मात्र इंडिया टीव्हीने आणि इतर काही प्रसारमाध्यमांनी हे नारे मोदी मोदी असे असल्याचे दाखवत चुकीचे वृत्त दिले. यूट्युबवर पब्लिक टीव्ही नावाचं चॅनल आहे त्यामध्ये पाहिल्यास हे लक्षात येतं की जी नारेबाजी पाकिस्तानच्या संसदेत करण्यात आली ती नारेबाजी मोदी मोदी अशी नव्हती तर “व्होटिंग व्होटिंग” अशी होती.

पब्लिक टीव्हीच्या व्हिडीओत १३ मिनिटं २६ सेकंदाला व्होटिंग व्होटिंग या घोषणा स्पष्टपणे ऐकू येत आहेत. त्यावर असंही सांगण्यात आलं आहे की हो व्होटिंग घेण्यात येईल. तरीही इंडिया टीव्हीने आणि इतर प्रसारमाध्यमांनी या घोषणा मोदी-मोदी आहेत असं सांगत चुकीचं वृत्त प्रसारित केलं. १३ मिनिट ४५ व्या सेकंदाला पाकिस्तानचे लोकसभा स्पीकर म्हणत आहेत की व्होटिंगची मागणी करता आहात ते होईल पण घोषणाबाजी करुन काय होणार आहे?

दरम्यान इंडिया टीव्हीने हे वृत्त दिल्यानंतर डॉ. हर्षवर्धन सिंह, अर्जुन सिंह, अनिल शर्मा, वरुण पुरी, संगीता कुमारी, इंदु तिवारी, तजिंदर पाल सिंह बग्गा अशा भाजपाच्या बड्या नेत्यांनीही पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी या घोषणा दिल्या गेल्याचा इंडिया टीव्हीच्या कथित वृत्ताचा व्हिडीओ ट्विट केला होता. मात्र प्रत्यक्षात या घोषणा व्होटिंग व्होटिंग अशा होत्या.

त्यात BJP नेत्यांनी एकावर एक असा ट्विटरवर सपाटाच लावला;

 

News English Summary: In a broadcast aired on October 28, India TV claimed that slogans of ‘Modi-Modi’ were raised in the Pakistani parliament. India TV editor-in-chief Rajat Sharma said while anchoring the show, “Today I want to first show you some pictures of Pakistan’s parliament. And I want to narrate what happened in the Pakistani parliament. You will also be shocked. I was also shocked to hear that slogans of Narendra Modi were chanted there. At first, I thought how could this happen? Pakistan’s parliament and chants of Modi’s name, how can this happen? Who raised them and why? So I watched the video multiple times and confirmed with several people from Pakistan. And the truth came out that Narendra Modi was remembered in the parliament of Pakistan. Many slogans were chanted in his name… heard in Pakistan’s parliament, ‘The one who is a friend of Modi is a foe of Pakistan’.”

News English Title: Fake News that there was no Modi Modi chants raised in the Pakistan Parliament News updates.

हॅशटॅग्स

#Fact Check(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x