चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु
वॉशिंग्टन, २५ एप्रिल: अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला असून, या भयावह आजाराने आतापर्यंत ५० हजार ३१६ जणांचा बळी घेतला आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे १५ हजार ७४० मृत्यू एकट्या न्यूयॉर्कमधील आहेत. न्यूयॉर्कखेरीज न्यू जर्सी, मिशिगन, मॅसेच्युएट्स आणि कॅलिफोर्निया या शहरांत आणि प्रांतांमध्येही कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू यांची संख्या वाढत चालली आहे. या पाच ठिकाणी मिळून आतापर्यंत सुमारे ३० हजार लोक मरण पावले आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने मोर्चबांधणी सुरु केली आहे. अमेरिका यासंदर्भात इतर राष्ट्रांना आपल्या बाजून वळवण्याचे प्रयत्न करत आहे. माइक पोम्पियो म्हणाले की, कोरोना विषाणूच्या मुद्यावर दुसऱ्या राष्ट्रांशी चर्चा सुरु आहे. या विषाणूची उत्पती ही चीनच्या वुहान शहरात झाली हे आम्ही इतर राष्ट्रांना सांगत आहोत. विषाणूसंदर्भात निर्माण होणाऱ्या उकल ही चीनने सर्वांसमोर करायला हवी.
We strongly believe that #China didn’t report the outbreak of the new #coronavirus in a timely fashion to the @WHO. Even after the CCP did notify the WHO of the coronavirus outbreak, China didn’t share all of the information it had. pic.twitter.com/D0tz1nbJRZ
— Secretary Pompeo (@SecPompeo) April 23, 2020
ते पुढे म्हणाले, डिसेंबर २०१९ मध्येच चीनमध्ये या विषाणूची पुष्टी झाली. चीनमधून देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अमेरिकेत थैमान घातले असून याठिकाणी मृतांचा आकडा वाढत असून अर्थकारणावरही याचे विपरित परिणाम जाणवत आहेत. जगभरात घोंगावत असलेल्या संकटाला चीन जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.
दुसऱ्या बाजूला करोना साथीच्या काळात अमेरिकी काँग्रेसने सुमारे ५०० अब्ज डॉलरची मदत जारी केली आहे. अडचणीत सापडेल्या कंपन्या, रुग्णालये यांना दिलासा देण्यासाठी ही मदत देण्यात येत आहे. करोना प्रादुर्भावामुळे अमेरिकेत सुमारे ५० हजार जणांचा मृत्यू झाला असून, दर सहा पैकी एकाची नोकरी गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मदतीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
News English Summary: The United States has launched a crackdown on China over the Corona virus. The US is trying to sway other nations in this regard. Mike Pompeo said discussions are underway with other nations on the issue of the corona virus. We are telling other nations that the virus originated in Wuhan, China. China should make the solution to the virus public.
News English Title: Story Covid 19 outbreak US will make sure other countries know that coronav irus originated in China says Mike Pompeo.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News